आदिवासी पाड्यावरचा कल्पेश झाला अधिकारी

Kalpesh-jadhav-Ajay-Naste
Kalpesh-jadhav-Ajay-Naste

पुणे - वीज न पोचलेले गावं (गाव नव्हे, वाडीच)...रस्ता कसा असतो, याची कल्पनाही नसलेला अतिदुर्गम भाग... शाळा संपल्यावर कॉलेजमध्ये जायचं, हेही माहीत नव्हतं, अशा अत्यंत दुर्लक्षित आदिवासी पाड्यावरचा कल्पेश हा मुलगा. प्रशासकीय सेवेत काम करण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले आणि अवघ्या एकविसाव्या वर्षी सहायक संचालक (कौशल्य विकास) पदासाठी तो निवडला गेला.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा (एमपीएससी) अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या पूर्वपरीक्षेसाठी राज्यातून एक लाख ९८ हजार ५९९ उमेदवार प्रविष्ट झाले होते. त्यातील एक हजार १९४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यातून ३७७ अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या सर्व उमेदवारांमध्ये कल्पेश हा वयाने सर्वांत लहान आहे.

‘‘मी मूळचा पालघर जिल्ह्यातील वाळवंडा गावातील (ता. जव्हार) खडकी पाड्यावरचा आहे. आठवीत जाईपर्यंत रस्ते आणि वीज आम्हाला माहीत नव्हते. आई-वडील निरक्षर. लग्न झालेली मोठी बहीण आणि भाऊ असा परिवार. जेमतेम दीड एकर शेती आणि तीही डोंगराळ भागामध्ये. आदिवासी विकास विभागाच्या योजना आणि आश्रमशाळा यामुळेच शिक्षणाची गंगा आमच्यापर्यंत पोचू शकली. 

दहावीत चांगले गुण मिळाल्याने आणखी शिक्षण घेण्याची इच्छा जागृत झाली. गणिताची आवड असल्याने हा विषय पदवीसाठी निवडला. अगदी अनावधाने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची महिती मिळाली. कोणताही क्‍लास लावणे आवाक्‍याबाहेर होते. म्हणून स्वत:च अभ्यास करून, ही परीक्षा दिली आणि त्यात यश मिळाले,’’ अशा शब्दांत कल्पेशने भावना व्यक्त केल्या आहेत.

तालुक्‍यात गेलो होतो, त्या वेळी वर्तमानपत्र हाती पडले. त्यात स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार झाल्याचे वाचायला मिळाले. ते वाचून आपल्यालाही असा मान मिळायला हवा, अशी ऊर्मी जागृत झाली आणि तोच आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला.
- कल्पेश जाधव

वडील शिक्षक होते, गेल्याच वर्षी केंद्र प्रमुख म्हणून निवृत्त झाले. पुण्यात इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेतले. परंतु, पदवी अभ्यास सुरू असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो. २०१४ मध्ये विक्रीकर निरीक्षक, २०१५ मध्ये मुख्य अधिकारी (गट ब), २०१६ मध्ये गट विकास अधिकारी म्हणून निवड झाली. ‘कर्जत-जामखेड’ च्या प्रांत अधिकारी (उप विभागीय अधिकारी) म्हणून माझी बहीण अर्चना नष्टे सेवेत आहे.
- अजय नष्टे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com