#WednesdayMotivation : टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचा कलात्मक पद्धतीने वापर

सुवर्णा नवले
Wednesday, 22 January 2020

गेल्या काही वर्षांत महिलांचा कल नवनवीन गोष्टींकडे वाढला आहे. परदेशातही भेटवस्तू देण्यासाठी महिला माझ्याकडे नावीन्यपूर्ण वस्तूंची मागणी करीत आहेत. सध्या माझ्या खणाच्या साड्यांना सर्वाधिक मागणी ओह. तशा या सौंदर्यप्रधान वस्तूंनाही मागणी आहे. मी आता व्यवसाय म्हणून नव्हे, तर महिलांनीही पुढे येऊन उद्योग करावा, या उद्देशाने प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. 
- सुनीता कुलकर्णी, उद्योजिका, प्राधिकरण

पिंपरी - घरातील कोणतीही वस्तू वापरात नसली की टाकाऊ समजून थेट कचऱ्याच्या डब्यात टाकली जाते. असाच चिंध्यांचा ढीग शिंप्याच्या दुकानातही दृष्टीस पडतो. ड्रेसचे विविध शिवणकाम झाल्यास उरलेले कापड एकतर टाकून दिले जाते अथवा गाठोडी बांधून ठेवली जाते. मात्र, याच चिंध्यांच्या कल्पकतेतून नावीन्यपूर्ण ड्रेस डिझाइनिंग व फॅन्सी वस्तू तयार करून ‘त्या’ उद्योजिका झाल्या आहेत. 

निगडी-प्राधिकरणातील सुनीता कुलकर्णी या वयाच्या ५६ व्या वर्षी हा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी या माध्यमातून मॅचिंग नेक पीस, इअरिंग्ज, साड्या व चुडीदारमध्ये सुंदर पॅच डिझाईन, सॅनिटरी पॅड कव्हर, मनी पर्स, हॅंड बॅग, शोल्डर बॅग तसेच शोभेच्या वस्तूंमध्ये दाराचे तोरण, की चेन, हॅंगिग अशा विविध नावीन्यपूर्ण वस्तू बनविलेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी या व्यवसायात हातखंडा मिळविला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुलकर्णी यांच्या खणांच्या साड्यांनाही परदेशात मागणी आहे. साड्यांवर त्यांनी तुकड्यांतील पॅच वर्क वापरून डिझाईन साकारलेली आहे. विविध पेहरावातील स्कर्ट, ब्लाऊज, तसेच टॉपवरही याच तुकड्यांमधून त्यांनी ड्रेस डिझाईनिंग केले आहे. सध्या त्या वैविध्यपूर्ण शिवणकामाचे महिलांना प्रशिक्षण देत आहेत. कारण पारंपरिक टेलरिंगची पद्धत नसल्याने प्रशिक्षण देऊन त्या काम करीत आहेत. शोभेच्या वस्तू तसेच विविध ड्रेस डिझाईन व इतर वस्तू तयार करण्यासाठी शिवणकाम येणाऱ्या व कामांसाठी महिलांची मागणी वाढली आहे. या माध्यमातून काम मिळाले आहे. दिलेल्या ऑर्डर पूर्ण करून महिला वेळेत घरी आणून देत आहेत. दिवसाला अंदाजे पाचशे ते हजार रुपयांची कमाई महिलांची होत आहे.

उन्हाळी सुट्यांचे करा बुकिंग!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of waste products artistically in the waste