वणवे कुटुंबीयांकडून शाळेला दहा संगणक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

मलवडी - ज्या शाळेच्या संस्कारांमुळे कुटुंबातील मुलं शिकली, नोकरीला लागली, त्यातून त्यांची कुटुंबे बहरली... त्या शाळेचं आपण काही तरी देणं लागतो, या भावनेतून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पळशीचे (ता. माण) रहिवासी  केशवराव वणवे व कुटुंबीयांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस तीन लाख रुपये किंमतीचे दहा संगणक संच भेट दिले.

सध्या प्रत्येक शाळा संगणकयुक्त करण्यात येत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग घेण्यात येत आहे. आपणही यात खारीचा वाटा उचलावा म्हणून केशवराव वणवे यांचे ज्येष्ठ चिरंजीव कैलास वणवे यांनी संगणक भेट देण्याचा निर्णय घेतला. सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेतच संगणकाचे ज्ञान मिळावे व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गावातील नवीन पिढी संगणक साक्षर व्हावी, या हेतूने वणवे कुटुंबाने संगणक भेट दिले. 

आम्ही शाळेत असताना आम्हाला संगणक वा अन्य सुविधा उपलब्ध नव्हत्या. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून कुटुंबाने शाळेस संगणक भेट दिले. पळशीतील सर्व वस्तीशाळांना टप्प्याटप्प्याने संगणक संच भेट देण्याचा मानस असल्याचे कैलास वणवे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vanave family 10 computer gives to school