‘वसुंधरा’ झटताहेत ‘पर्यावरणा’साठी

नंदिनी नरेवाडी
मंगळवार, 8 जानेवारी 2019

कोल्हापूर - त्या ७० जणी झटताहेत केवळ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. आपण एकत्र आलो  तरच आपल्या कामाने इतरांना दिशा मिळेल हा उद्देश ठेवून ‘त्या’ वसुंधरा वाचविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग  झाल्या आहेत.

कोल्हापूर - त्या ७० जणी झटताहेत केवळ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. आपण एकत्र आलो  तरच आपल्या कामाने इतरांना दिशा मिळेल हा उद्देश ठेवून ‘त्या’ वसुंधरा वाचविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग  झाल्या आहेत.

‘वसुंधरा ग्रुप’च्या माध्यमातून जमलेला घरातीलच कचरा, बागेतील पालापाचोळा बाहेर न फेकता त्याचे कंपोस्ट खत करून घरातील फुलविलेल्या रोपांना देत आहेत.

या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे असल्यास अट एकच. ती म्हणजे बागकामाची आवड आणि कंपोस्ट खत  वापरण्याची तयारी. ‘क्‍लीन टू ग्रीन’ हा उद्देश समोर ठेवून येथील ७० महिला एकत्र आल्या. आणि त्यातून वसुंधरा वाचविण्यासाठी झटू लागल्या. अशा महिलांचा एक ग्रुप म्हणजे हा वसुंधरा ग्रुप. या ग्रुपमधील प्रत्येक सदस्याची एक बाग आहे. आणि प्रत्येक बागेचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. 

या ग्रुपमधील सदस्यांची बागकामातील एका कोर्सवेळी ओळख झाली आणि सर्वांनाच बागकामाची आवड असल्याने या ग्रुपची रमेश शहा यांच्या पुढाकाराने ग्रुपची स्थापना झाली. प्रत्येक सदस्याच्या घरात स्वतःचे किचन गार्डन तयार केले. यामध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाऊ लागले. यानंतर शहरातील विविध ठिकाणी जाऊन नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

प्रत्येक महिन्याला एका सदस्याच्या घरात बैठक होते. या बैठकीत बागेमधील फळझाडे, शोभेची झाडे, पालेभाजी, लागवडीबाबत येणाऱ्या अडचणीवर चर्चा होते. प्रत्येक सदस्य आपले अनुभव, आपल्या अडचणी तसेच वेगळ्या प्रयोगांची माहिती देतो. तसेच एकमेकांच्या घरातील रोपे, बियाणे, कटिंग्स यांची देवाणघेवाणही होते. 

घरच्या घरी जैविक रसायन 

विविध फळांच्या साली वापरून फ्रुट पिल एन्झाईन हे लिक्वीड तयार केले आहे. त्याचा वापर भांडी घासण्यासाठी, फरशी पुसण्यासोबतच बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठीही केला जाऊ शकतो. शिवाय ज्या फळाच्या सालीपासून हे लिक्वीड बनवले आहे, त्याचा सुगंधही येत असल्याने ग्रुपमधील सदस्य घरी याच प्रकारचे लिक्वीड वापरतात. जयश्री कजारिया, मृणालिनी डावजेकर, संगीता कोकितकर, तृप्ती देशपांडे यांनी हे लिक्‍वीड बनविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasundhara Groups work special