वेदांगीचा १३ देशांचा प्रवास पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी हिने सुमारे १३ देशांमधून २७ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रीचा मुक्काम करून ती वडिलांसमवेत पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे. 

वेदांगी कुलकर्णी (वय १९) मूळची कोल्हापूरची. ज्ञानप्रबोधिनी, निगडी येथे तिने शिक्षण घेतले. सध्या ती इंग्लंडमधील बोर्नमथ विद्यापीठात क्रीडा व्यवस्थापनातील पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.

दिग्गज सायकलपटूंपासून प्रेरणा घेत तिने ११० दिवसांत २९ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार, ऑस्ट्रेलियातील पर्थ येथून १७ जुलैला जगप्रवासाला सुरवात केली. १३ देशांमधून सायकल प्रवास करून वेदांगी नुकतीच भारतात दाखल झाली. देशामधून प्रवास करताना पिंपरी-चिंचवडमध्ये तिने रात्रीचा मुक्काम केला होता. 

तिचे वडील विवेक कुलकर्णी म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियामधून न्यूझीलंड, कॅनडा, युरोप, रशिया आदी १४ देशांमधून वेदांगीने आतापर्यंत २७ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. रशियातून प्रवास करताना तिला उणे १८ अंश सेल्सिअस तापमानात सायकल चालवावी लागली. तेथील जनतेने तिच्या धाडसाचे खूपच कौतुक केले. आता भारतातील प्रवास पूर्ण करत ऑस्ट्रेलिया येथील पर्थमध्येच ती सायकल प्रवासाचा शेवट करणार आहे.’’

जगप्रवासापूर्वी वेदांगी हिने केवळ ७८ दिवसांत जगप्रवास करणारा मार्क बिऊमाँट याची भेट घेण्यासाठी तब्बल ७०० किमीचा प्रवास केला. त्याच्याकडून तिने मार्ग आणि विविध देशांतील हवामानाची माहिती घेतली. 

अल्पवयीन सायकलपटू होणार
वेदांगी हिला ११० दिवसांत २९ हजार किमी कापण्यात यश आले नाही. परंतु, अल्पवयीन सायकलपटू म्हणून गिनेज बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये नोंदविण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने, तिची वाटचाल सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vedangi Kulkarni Cycle Player Motivation