‘वेकअप मराठवाडा’चे ‘उमंग’ला बळ
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) विद्यार्थ्यांचा ‘उमंग’ ग्रुप विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. त्यांच्या या कार्याला आपलाही हातभार लागावा, यासाठी मराठवाड्यातील माजी विद्यार्थी, डॉक्टर, अभियंते व अधिकाऱ्यांच्या ‘वेकअप मराठवाडा’ या व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांनी सोमवारी (ता. २३) ‘उमंग’ला अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते मदतीचा धनादेश दिला.

घाटीच्या यूजी मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात मोठे मैदान आहे. सध्या त्याची अवस्था बकाल झाल्याने त्याचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे ‘उमंग’ने या मैदानाची स्वच्छता, सुशोभीकरण व वृक्षलागवडीचे काम हाती घेतले. या कामाला दीड लाखापर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी ‘उमंग’ने फेसबुकवरून मदतीचे आवाहन केले होते. त्याला ‘वेकअप मराठवाडा ग्रुप’ने प्रतिसाद देत आर्थिक मदत केली.
यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी डॉ. संदीप घोणशीकर, डॉ. सचिन मुखेडकर, डॉ. सचिन सोळंकी, कुलदीप बावळे, डॉ. महेश जंबुरे, डॉ. श्रीपाद कौसडीकर या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
‘घाटी’साठी धडपड
‘उमंग’ घाटीच्या विकासाठी धडपड करीत आहे. या ग्रुपने आतापर्यंत घाटीत रक्तदान शिबिरे, रुग्णांना मार्गदर्शन करणे, आरोग्य तपासणी, औषधी वाटप, यूजी बॉईज होस्टेलच्या परिसरातील वृक्षलागवड व त्यासाठी ठिबकचे काम केले. यापुढेही असेच विविध उपक्रम राबविणार असल्याचे सुमित शिंदे, वैष्णवी यादव, स्मिता मोरे, प्रियांका पळकुटे यांनी सांगितले.