#FridayMotivation : लोकसहभागातून विहिरींचे काम; श्रमदानातून उभारले बांध

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

उन्हाळ्यात या वाड्या-वस्त्यांना दोन किलोमीटरवरून डोंगराचा चढ-उतार करून पाणी आणावे लागत होते. ग्रामस्थांचे श्रमदान व ज्ञानप्रबोधिनी संस्थेने केलेल्या सहकार्यामुळे करणे शक्‍य  झाले आहे.  

गुंजवणे  - राजगड किल्ल्याच्या डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेल्या गुंजवणे (ता. वेल्हे) गावातील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण कायमची संपुष्टात आली आहे. उन्हाळ्यात या वाड्या-वस्त्यांना दोन किलोमीटरवरून डोंगराचा चढ-उतार करून पाणी आणावे लागत होते. ग्रामस्थांचे श्रमदान व ज्ञानप्रबोधिनी संस्थेने केलेल्या सहकार्यामुळे करणे शक्‍य  झाले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुंजवणी गावात बारा वाड्या असून, धनगर वस्ती, चाफेमाळ व गावठाण येथे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून पर्सिस्टंट फाउंडेशन (पुणे) यांच्या अर्थसाह्याने धनगर वस्ती व चाफेमाळ या वाड्यांवर लोकसहभागातून दोन विहिरी खोदल्या असून, एक विहीर पूर्ण झाली, तर एकीचे काम सुरू आहे. या दोन्ही विहिरींना वर्षभर पुरेल एवढे पाणी आहे. गावठाण येथे गोपाळ इंगुळकर व वाडीत लोकवर्गणीतून डोंगरातील पाणवठ्यावरून जलवाहिनीने पाणी आणले, ते २४ तास नळाला येत आहे, त्यासाठी वीजही लागत नाही.  

'या' कारणामुळे पुण्यात पुन्हा थंडी परतली!

गावात दहा विहिरी असून, २६ जानेवारीला ग्रामस्थांनी पाणी प्रवाह चालू असलेल्या ओढ्यात मातीचे बंधारे बांधले, त्यामुळे साठलेले पाणी वापरास येत आहे, तर गावातील विहीर तुडुंब भरलेली आहे. दरवर्षी जंगलात पाणवठे आटल्यानंतर प्राणी गावाकडे धाव घेतात, त्यामुळे ते विहिरीत पडण्याचे प्रकार घडत होते. या वर्षी जंगलातील पाणवठ्यांनादेखील मातीचे बांध ग्रामस्थांनी घातले आहेत, ते पाणवठे पाण्याने भरले आहेत.

गावाला पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी सरपंच अंजना निढाळकर, उपसरपंच दिलीप कोथमिरे, ग्रामसेवक कांबळे, गुलाब रसाळ, सतीश मोरे, गोविंद रसाळ, अण्णा लिम्हण, सुभाष शिळीमकर, सतीश कडू, अंकुश रसाळ, संतोष पडवळ,  विलास रसाळ, अंकुश भिलारे, विद्यार्थिनी मानसी बांदल, प्रतीक्षा रसाळ, पूजा भोसले, वैष्णवी हरपुडे यांनी मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water scarcity of the citizens of Gujawane village has come to an end