तीन दिवसांच्या बाळाला मिळाले जीवदान

महादेव पवार 
Wednesday, 30 September 2020

संदीपने रुग्णालयात जाऊन कुठलाही गाजावाजा न करता रक्तदान करून माणुसकीच्या नात्याचे एक चांगले उदाहरण समाजासमोर मांडले. वेळीच मदत उपलब्ध झाल्यामुळे बाळ, बाळंतीण सुखरूप आहेत.

वारजे - बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या हृदयात छिद्र असल्याचे डॉक्‍टरांना दिसून आले, त्यासाठी त्याला तत्काळ ताज्या रक्ताची गरज होती. वारजे येथे झालेल्या रक्तदान शिबिरात याच बाळाला रक्तदान करण्यासाठी योग्य असलेली व्यक्ती मिळाली आणि बाळाचा जीव वाचला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिरूरवरून पुण्यात बाळंतपणासाठी एका खासगी दवाखान्यामध्ये एक महिला आली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र या  नवजात बाळाच्या ह्रदयाला छिद्र असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले.  या बाळाला ताबडतोब फ्रेश ए-पॉझिटिव्ह रक्ताची आवश्‍यकता असल्याचे डॉक्‍टरांनी या कुटुंबाला सांगितले. कुटुंब बाहेरगावचे असल्यामुळे कुटुंबातील व्यक्तीने वारजे माळवाडी येथे राहत असलेल्या एका नातेवाइकांना फोन करुन तातडीने रक्ताची सोय करता येईल का, अशी विचारणा केली. त्यांनी त्वरित माजी नगरसेवक किरण बारटक्के यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारटक्के यांनी कोरोना काळात नुकतेच रक्तदान शिबिर घेतले असल्यामुळे त्यांनी त्वरित रक्तदात्यांच्या सूचीमध्ये ए-पॉझिटिव्ह रक्तदाता तपासला असता संदीप यादव हा दाता मिळाला. बारटक्के यांनी क्षणाचाही विलंब न लावता या आपल्या मित्राशी संपर्क केला व त्वरित रुग्णालयात जाण्याची विनंती केली. शब्दाला मान देत संदीपने रुग्णालयात जाऊन कुठलाही गाजावाजा न करता रक्तदान करून माणुसकीच्या नात्याचे एक चांगले उदाहरण समाजासमोर मांडले. वेळीच मदत उपलब्ध झाल्यामुळे बाळ, बाळंतीण सुखरूप आहेत.

 प्रयोगशील शेतकरी सोपान शिंदे यांना रेशीम शेतीने दिली आर्थिक साथ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth donated blood and gave life to the three day old baby