esakal | झेडपी अधिकाऱ्यांतर्फे दिवाळी फराळ 
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपी अधिकाऱ्यांतर्फे दिवाळी फराळ 

पुणे जिल्हा परिषदेत असा पहिलाच प्रयोग आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उपक्रमाची व्याप्ती वाढवता आली नाही. त्यामुळे यंदा मावळ, आंबेगाव, जुन्नर आणि खेड या आदिवासी भागातील आश्रमशाळा, वृद्धाश्रमापुरताच उपक्रम मर्यादित आहे, असे उदय जाधव यांनी सांगितले. 

झेडपी अधिकाऱ्यांतर्फे दिवाळी फराळ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेच्या वर्ग एक आणि दोनच्या सर्व अधिकाऱ्यांनी स्वत:च्या खिशातून दहा लाख रुपयांची वर्गणी गोळा केली आहे. या वर्गणीतून जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिवाळी फराळाचे वाटप मंगळवारपासून मावळ पंचायत समितीतून (ता. 22) सुरू केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीही वर्गणीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. 

पुणे जिल्हा परिषदेत असा पहिलाच प्रयोग आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उपक्रमाची व्याप्ती वाढवता आली नाही. त्यामुळे यंदा मावळ, आंबेगाव, जुन्नर आणि खेड या आदिवासी भागातील आश्रमशाळा, वृद्धाश्रमापुरताच उपक्रम मर्यादित आहे, असे उदय जाधव यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. दिवाळी फराळवाटपामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद पाहून हा उपक्रम सार्थकी लागल्याचे स्पष्ट झाले. भविष्यात उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा मानस आहे. 
- उदय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, पुणे. 

loading image