दीड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 August 2017

रत्नागिरी : दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावर पावसाचे सावट होते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांसह विसर्जन घाटावर भक्‍तगणांची गर्दी दिसून येत होती. जिल्ह्यातील 2 सार्वजनिक आणि 9,967 घरगुती गणपतींना भक्‍तिभावाने पुढच्या वर्षी लवकर या...ची साद घालत निरोप दिला. 

लाडक्‍या गणरायाची पूजा-अर्चा करण्यासाठी सर्वचजणं उत्सुक असतात. गणपतीचे आगमन झाल्यानंतर अनेक भक्‍तगण परंपरेप्रमाणे दीड दिवसांनी विसर्जन करतात. शुक्रवारी (ता. 25) धुमधडाक्‍यात गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आज सायंकाळी त्याला निरोप देण्यासाठी सर्वचजणं सज्ज होते. रत्नागिरी शहरात मांडवी, भाट्येसह पांढरा समुद्र येथे गणपती विसर्जनासाठी गर्दी होती. दिवसभर पडणाऱ्या पावसाने दुपारनंतर विश्रांती घेतली होती. याचा फायदा अनेकांनी घेतला; परंतु सायंकाळपर्यंत पावसाचे सावट होतेच. किनारी भागात निर्माल्य संकलन कलश ठेवण्यात आले होते. 

* रत्नागिरी शहर 438 
* ग्रामीण 114 
* जयगड 272 
* संगमेश्वर 757 
* राजापूर 2475 
* नाटे 463 
* लांजा 125 
* देवरूख 265 
* सावर्डे 140 
* चिपळूण 375 
* गुहागर 630 
* अलोरे 150 
* खेड 898 
* दापोली 1205 
* बाणकोट 215 
* मंडणगड 920 
* पूर्णगड 136 
* दाभोळ 390

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Kokan Ganesh Utsav