आयनलमध्ये ‘नमो नाथायऽऽ’चा मंत्रजप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 September 2017

नांदगाव - ओम...नमो नाथाय नमः असा मंत्रजप करत शंखनाद घुमवत, अंगावर भगवे वस्त्र, हातात देवीचे पतिर, कानात मुद्रिका, डोक्‍यावर टोपी घालून नवरात्रात घरोघरी भिक्षा मागण्याची परंपरा माईण येथील तरुण रामकृष्ण गोसावी जपत आहेत. 

आयनल येथे प्रत्येक घरात त्यांचे आदराने स्वागत करून देवीची भक्तिभावाने पूजा करून भिक्षा दिली जाते.नवरात्रीत देवीची विविध प्रकारे सेवा चाकरी केली जाते. घरी घटस्थापना, महिला विविध प्रकारचे धान्य रुजू (रुजवण) घालतात. मंदिरात जागर होतो. याचबरोबर याच नऊ दिवसात अनेक रूढी-परंपराही पाहायला मिळतात, तशीच एक परंपरा गोसावी समाज जोपासताना दिसत आहे. 

नवनाथांपैकी नाथपंथी म्हणून गोसावी समाज ओळखला जातो. नवनाथांमध्ये भिक्षा मागण्याची प्रथा होती. आणि तीच प्रथा आजही गोसावी समाजाने सुरू ठेवली असल्याचे या श्री. गोसावी यांनी सांगितले. परंपरेनुसार खांद्याला एक भगवी झोळी, हातात भोपळा कोरून देवीसाठी तयार केलेले पतिर, शंख, कानात मुद्रिका घालून भिक्षा मागावी लागते. आजकाल पूर्णपणे भगवा वेश करत नरले तरी भगवे वस्त्र अंगावर घेतात. 

जेव्हा भिक्षा मागण्यासाठी गोसावी जातो तेव्हा घराजवळ शंखनाद करतो. घरातील मंडळी आदराने गोसावीचे स्वागत करून त्यांच्याजवळ असलेल्या पतिरमधील देवीची मनोभावे पूजा करतात. 

देवीला ओटी देऊन गाऱ्हाणे करून गोसावीला तांदूळ आणि तेल भिक्षा म्हणून दिली जाते. या वेळी गोसावी लोकांना चांगले उपदेश करून समाज प्रबोधन करण्याचेही काम करत आहेत. गोसावी समाजाची तरुण पिढीही ही परंपरा जोपासत लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhudurg news to preserve the tradition of Goasavi Samaj