पाली खोपोली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

अमित गवळे
मंगळवार, 7 मे 2019

पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली जिल्हा परिषद शाळेसमोर मंगळवारी (ता. ७) सकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. व्यंकटेश कृष्णा पवार (वय ४३) रा. टाटाचा माळ, ता. सुधागड असे या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यंकटेश कृष्णा पवार हे सकाळी सात वाजण्यापुर्वी टाटाच्या माळकडून पेडली गावाकडे चालत जात होते. यावेळी पेडली जिल्हा परिषद शाळेसमोर आले असता कोणत्यातरी वेगवान अज्ञात वाहनाने पवार यांना धडक दिली. धडक देवून अज्ञात वाहनचालक पसार झाला. या अपघातात पादचारी पवार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळपाडा येथील दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालका विरोधात पाली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. जी. पी. म्हात्रे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 dies on pali khopoli road