जलसंवर्धनातून पाणीपुरवठ्यासाठी 10 कोटीचा निधी उपलब्द करणार - अनंत गिते 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्द करुन देणार असल्याचे सांगितले. 

पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्द करुन देणार असल्याचे सांगितले. 

जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्द करुन देणार. रायगड मतदारसंघात रुग्ण व अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी 16 तालुक्यात रुग्णवाहिका दिल्या जाणार असून अलिबाग येथे हा कार्यक्रम होणार आहे. तसेच 40 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रॉनिक स्कुटर वाटपाचा कार्यक्रम देखील पालीत घेतला जाणार असल्याचे गीतेंनी जाहीर केले. विकासकामांची ऍडव्हान्स बुकिंग होणारा देशातील मी एकमेव खासदार आहे. पहिल्या वर्षीचे पाच कोटी पहिल्याच दिवशी संपतात असे ते म्हणाले. 

मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्व. सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण फलकाचे अनावरण सु.ए.सोचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते वसंत ओसवाल यांनी मराठा समाज भवनास आमदार फंडातून 10 लाखाचा निधी उपलब्द करुन देणार असल्याचे जाहीर केले. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी मराठा समाज भवन सभागृह सुशोभीकरण करण्याचे व शिवाजी महाराजांचा पुतळा सभागृहात उभारणार असल्याचे जाहीर केले. यावेळी धनंजय साजेकर म्हणाले की मराठा समाज भवनातून समाजाची सर्वांगिण प्रगती साधण्याच्या दृष्टीकोणातून विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमास अनंत गिते, वसंत ओसवाल,किशोर जैन, रविंद्र देशमुख, साक्षी दिघे, विजया साजेकर, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपतराव सितापराव, कार्याध्यक्ष धनंजय साजेकर, उपाध्यक्ष गंगाधर जगताप, बांधकाम कमिटी उपाध्यक्ष हनुमंत बेलोसे, खजिनदार बळिराम निंबाळकर, सरचिटणिस जिवन साजेकर, संचालक गोविंद तळेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बळीराम निंबाळकर तर सुत्रसंचालन नरेश शेडगे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 crores funding for water conservation - Anant Gite