तीन वर्षाच्या आत्याचाराने ती राहिली गरोदर आणि... 

10 years imprisonment for rape case
10 years imprisonment for rape case

ओरोस - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत एका खाजगी रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या प्रज्योत प्रदीप नाईक (२५, रा. सरंबळ देउळवाडी) याला जिल्हा विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी दोषी ठरविले आहे. दहा वर्षे सश्रम कारावास व पीडित मुलीला देण्यासाठी दहा हजार रूपये दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी, पीडिता ही मावस भावासोबत गेली असता आरोपी व तिची ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर  प्रज्योत याने तिला लग्नाचे आमिष दाखवत एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१९ या कालावधीत विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले होते. डिसेंबर २०१६ मधे तिचा जबरदस्ती गर्भपातही करून घेतला होता.

याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादिनुसार प्रज्योत याच्यावर तसेच त्याला गर्भपात करण्यासाठी सहकार्य केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एका डॉक्टर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रज्योत यांच्यावर 27 मार्च 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  २८ रोजी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला १ एप्रिल पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनाविली होती. त्यानंतर तो 7 जून पर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तो जामिनावर मुक्त होता. 

 
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा विशेष न्यायालयात पूर्ण झाली असून याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरविले आहे. यावेळी एकूण सहा जणांची साक्ष घेण्यात आली. यात पीडित मुलगी व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरची साक्ष महत्वाची ठरली. यावेळी सरकारी पक्षाने अत्याचार झाला त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे न्यायालयाने साक्ष पुराव्याच्या जोरावर प्रज्योत याला दोषी ठरविले. याप्रकरणी तपासिक अंमलदार म्हणून महिला पोलिस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी काम पाहिले होते.

 
भादवि कलम 376 (3), (12) नुसार आरोपीला निर्दोष सोडले. तर 376 (1), (2) व अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3, 4, 5, 6 नुसार दोषी ठरवत 10 वर्षे सश्रम कारावास आणि पीडित मुलीला देण्यासाठी 10 हजार रूपये दंड ठोठावला आहे. भादवि कलम 417 नुसार सहा महीने सश्रम कारावास व 516 अंतर्गत 1 वर्ष कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एकत्रित भोगावयाची असल्याने 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रूपये दंड ही एकत्रित शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील प्रज्योत याने सुरुवातीला भोगलेली शिक्षा कमी करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com