esakal | Ratnagiri : पवारांमुळेच १०५ आमदार विरोधी बाकावर ; तटकरे
sakal

बोलून बातमी शोधा

सुनील तटकरे

पवारांमुळेच १०५ आमदार विरोधी बाकावर : तटकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राज्यात १०५ आमदार असतानादेखील त्यांना विरोधी पक्षात बसविण्याची किमया फक्त शरद पवारच करू शकतात. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यामध्ये शरद पवार यांची इच्छाशक्ती आणि प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत. त्या सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. ही अद्‍भुत राजकीय किमया पवारसाहेबांमुळेच घडून आली, असे सांगत, ‘‘आपल्याला आघाडीचे सरकार टिकवायचे आहे, पाच वर्षे सरकार टिकविणे ही आपली जबाबदारी आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा कार्यकर्ता बैठकीत केले.

या बैठकीत शरद पवार यांच्याविरोधात टीका केल्याबद्दल माजी खासदार अनंत गीते यांच्या निषेधाचा ठरावही करण्यात आला. सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी जिल्हा राष्ट्रवादीची आढावा बैठक झाली. या वेळी तटकरे यांच्याबरोबर आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, कुमार शेट्ये, बशीर मुर्तूझा, दादा साळवी, स. तु. कदम, मिलिंद कीर, विवेक शेरे, राजू आंबे, मिलिंद कापडी, सर्व सेलचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा क्षेत्राध्यक्ष आदी उपस्थित होते.

loading image
go to top