संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) संगमेश्वर निढळेवाडी येथे जीप आणि मोटार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवाशांपैकी ११ जण जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात (Sangameshwar Rural Hospital) प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. हा अपघात निढळेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर मंगळवारी (ता. ८) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास झाला.