रत्नागिरी : तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशीयांची १५ मे रोजी बांगलादेशात रवानगी केली जाणार आहे. न्यायालयाने त्यांना ठोठावलेली सहा महिन्यांची शिक्षा १४ मे रोजी संपणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी बांगलादेश-भारताच्या बॉर्डरवरील (Bangladesh-India Border) सुरक्षायंत्रणेच्या (BSF) ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.