खिशात पैसे नाही आणि उन्हामुळे झोपडीत बसता येत म्हणून ते 150 जण निघाले अन्.....

150 people traveling to Solapur were arrested by the Chiplun police kokan marathi news
150 people traveling to Solapur were arrested by the Chiplun police kokan marathi news

चिपळूण (रत्नागिरी) : दापोलीहून चिपळूणमार्गे सोलापूरला निघालेल्या 150 जणांना चिपळूण पोलिसांनी सती चिंचघरी येथे ताब्यात घेतले. त्यांना खेर्डी (ता. चिपळूण) येथील झोपड्यांमध्ये थांबण्याची सूचना करण्यात आली. हे सर्वजण मजूर कामगार आहेत. बांधकाम क्षेत्रातील कामासाठी ते जिल्ह्यात दाखल झाले होते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या काळात सर्व कामे ठप्प आहेत. त्यामुळे सर्वाधिक नुकसान हातावर पोट असलेल्या नागरिकांचे झाले आहे. बेळगाव, सोलापूर येथील शेकडो कुटूंब रोजी-रोटीसाठी कोकणात आले आहेत. ही कुटूंब बांधकाम क्षेत्रात मिळेल ती कामे करतात. यातील दिडशे कुटूंब खेर्डी येथे राहत होते. लॉकडाऊन पूर्वी त्यांना दापोली तालुक्यात ठिकठिकाणी कामे मिळाली त्यामुळे ते दापोली तालुक्यात गेली होती. 

सोलापूरला निघालेल्या 150 लोकांना चिपळूण पोलिसांनी घेतले ताब्यात

मात्र लॉकडाऊनमुळे कामे ठप्प झाल्यानंतर आणि जागोजागी रस्ते अडविल्यामुळे दिडशे कुटूंब दापोली तालुक्यातच अडकली. हातात काम नाही. खिशात पैसे नाही आणि उन्हामुळे झोपडीत बसता येत नाही त्यामुळे या कामगारांची चलबिचल सुरू होती. शुक्रवारी जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणार्‍या ट्रकमधूून सोलापूरला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दुपारी एक वाजता सती चिंचघरी येथे ट्रक आल्यानंतर पोलिसांनी ते ट्रक थांबविले चौकशी केल्यानंतर त्यामध्ये लोक असल्याचे आढलून आले. त्यानंतर पोलिस निरिक्षक देंवेद्र पोळ यांना संपर्क करण्यात आला. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. चौकशी केल्यानंतर ते सोलापूरमध्ये जात असल्याचे आढळून आले. श्री. पोळ यांनी या सर्वांना सोलापूरला जाण्यापासून रोखले. त्यांना पुन्हा खेर्डी येथील झोपड्यांमध्ये ठेवण्यात आले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com