
जिल्ह्यात नियंत्रणात असलेली कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दुसऱ्या लाटेच्या भितीने प्रशासन सज्ज असले तरी रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. गणेशोत्सवानंतर जशी रुग्णांची संख्या वाढली ती परिस्थिती दिवाळीनंतर उद्भवू नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात 128 चाचण्यांपैकी 16 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 13 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आज एकाचाही मृत्यू झाला नाही. मृत्यूदर 3.63 वर स्थिर आहे.
जिल्ह्यात नियंत्रणात असलेली कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दुसऱ्या लाटेच्या भितीने प्रशासन सज्ज असले तरी रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. गणेशोत्सवानंतर जशी रुग्णांची संख्या वाढली ती परिस्थिती दिवाळीनंतर उद्भवू नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 128 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये 16 रुग्ण बाधित सापडले असून 112 निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये 16 आरटीपीसीआर सापडले असून एकही ऍण्टिजेनमधील चाचणी करण्यात आलेली नाही. त्यात रत्नागिरी 2, दापोली 4, खेड 2, मंडणगड 4, लांजा 4 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 8 हजार 809 झाली आहे. तर 54 हजार 746 जणांचा अहवाल निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 13 रुग्णांनी कोरोनावर मात केली बरे झालेल्यांची संख्या 8 हजार 280 झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण 93.99 टक्के झाली आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झालेला नसून एकूण बळींची संख्या 320 झाली आहे. मृत्यूदर 3.63 टक्केवर स्थिर आहे. जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरवर 125 जण उपचार घेत आहेत.
दृष्टिक्षेपात -
* एकुण पॉझिटिव्ह -- 8,809
* एकुण निगेटिव्ह --54,746
* बरे झालेले रुग्ण -- 8,280
* एकुण मृत्यू -- 320