कणकवलीत गुणवंतांचा १६ला सत्कार

कणकवलीत गुणवंतांचा १६ला सत्कार

88964

कणकवलीत गुणवंतांचा १६ ला सत्कार

ग्राहक पंचायतीची सभा ः श्रद्धा कदम यांचे अभिनंदन

कणकवली, ता. ९ ः ग्राहक पंचायत महाराष्ट्र, तालुका शाखा कणकवली, ज्येष्ठ नागरिक संघ, कणकवली आणि पेन्शनर असोसिएशन, कणकवली यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार १६ जून रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा कणकवलीच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, तालुका शाखा कणकवलीची वार्षिक सभा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कार्यालय, कणकवली येथे जिल्हा संघटक सीताराम कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत विषय पत्रिकेनुसार सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सचिव पूजा सावंत यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा संघटक श्री. कुडतरकर यांनी आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करताना सांगितले की, कणकवली तालुक्यात दहावी, बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याविषयी सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी शाखा कणकवलीच्या अध्यक्षा श्रद्धा सूर्यकांत कदम, सचिव पूजा प्रकाश सावंत, उपाध्यक्षा गीतांजली कामत, जिल्हा महिला प्रतिनिधी रिमा राजन भोसले, तसेच संस्थेचे सल्लागार मनोहर पालयेकर, संघटक विनायक पाताडे, सहसंघटक सुभाष राणे, प्रकाश वाळके, सदस्य राजन भोसले, आयेशा सय्यद आणि विलास चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, तालुका शाखा कणकवलीच्या काही पदाधिकाऱ्यांची फेरनिवड करण्यात आली. त्यामध्ये संघटक जे. जे. शेळके, सहसंघटक राजन भोसले, कोषाध्यक्ष सुभाष राणे, सदस्य विलास चव्हाण यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. श्रद्धा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. गेले वर्षभर विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्वांनी चांगले सहकार्य केले. त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com