रत्नागिरी समुद्र किनारी आहेत सॉफ्ट कोरल्स प्रवाळ प्रजाती

रत्नागिरीतील प्रा. स्वप्नजा मोहिते यांचे संशोधन; कायद्यामुळे होऊ शकते संवर्धन
रत्नागिरी समुद्र किनारी आहेत सॉफ्ट कोरल्स प्रवाळ प्रजाती

रत्नागिरी : तालुक्यातील (ratngiri) अलावा, मिऱ्या, आरे-वारे, उंडी आणि वायंगणीसह आजूबाजूच्या किनाऱ्यांवर प्रवाळांच्या सॉफ्ट कोरल्स (soft corals) प्रजातींसह रंगीत मासे आणि स्पॉन्जेसच्या १८ प्रजाती आढळतात. हे प्रा. स्वप्नजा मोहिते यांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याने प्रवाळांच्या सगळ्या प्रजातींना संरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याने येथील या प्रवाळांचे संरक्षण करणे सोपे जाईल.

कांदळवन कक्षामार्फत किनाऱ्यांवरील चिपींसह प्रवाळ बेटांच्या संरक्षणासाठी पावले उचलली जात आहेत. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून (central government) मंजुरीही मिळाली. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील (sindhudurg) ही प्रवाळे संरक्षित करण्याला चालना मिळणार असून, पर्यटनालाही त्याचा उपयोग होईल. कोकण (kokan) किनाऱ्यावर सापडणाऱ्या प्रवाळांबाबत प्रा. मोहिते या गेली सहा वर्षे अभ्यास करीत आहेत. त्यांना अनेक प्रवाळं आणि विविध रंगीबेरंगी माशांच्या प्रजाती आढळल्या आहेत. किनारपट्टीवरही प्रवाळांची बेटे किंवा रीफ्स असंख्य जलचरांच्या सपोर्ट सिस्टिम्स संशोधकांना पाहायला मिळतात.

रत्नागिरी समुद्र किनारी आहेत सॉफ्ट कोरल्स प्रवाळ प्रजाती
सिंधुदुर्गात होतेय 'हळद क्रांती'; शेती दृष्टीने शुभसंकेत

शहराजवळील अलावा, मिऱ्या; तर तालुक्यात आरे-वारे, उंडी आणि वायंगणी येथे खडकाळ किनाऱ्यांवर प्रवाळांच्या सॉफ्ट कोरल्स प्रजाती विशेषतः फविआ, हार्ड कोरलच्या पोरिट्स, अक्रोपोरा, मोन्टीपोरा अशा प्रजाती आहेत. अन्न मिळविण्यासाठी, निवारा किंवा लपण्याच्या जागा, नर्सरी ग्राउंड्स म्हणून अनेक जलचर प्रवाळांच्या बेटांचा आश्रय घेतात. प्रवाळांच्या सोबत वाढणारे स्पॉन्जेस, सागरी शैवाल आणि इतर जीव हे अनेक सागरी अन्नसाखळ्यांचे दुवे असतात.

किनारपट्टीचा अभ्यास करताना प्रवाळ आणि या सागरी स्पॉन्जेसचा सहसंबंध लक्षात आला. त्याचबरोबर चांदणी मासे, ब्रिटल स्टार, सी अर्चिन, इलिशियासारखे न्यूडिब्रँक्स, मासे, कालवे, शिंपले आणि सागरी शैवालाच्या कॉलरपा, सरगॅसम, पडायना, कोरॅलिना, अँफिरोआसारख्या कोरलाईन अल्गी, उल्व्हा, ग्रॅसिलॅरिया आणि इतर असंख्य प्रजाती इथे सापडतातच. पण, त्याचबरोबर खेकडे, समुद्र काकडी, डॅमसेल, सार्जंट मेजरसारखे अनेक रंगीत मासे आणि स्पॉन्जेसच्या १८ प्रजाती इथे सापडल्या आहेत. हे रत्नागिरीच्या किनारपट्टीतील जैवविविधतेचे द्योतक आहे आणि म्हणूनच त्याची काळजी, संरक्षण ही काळाची गरज आहे. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग किल्ल्यापासून जवळ असणारे आंग्रिया बँक हे बेट आहे. ८०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या समुद्रात बुडलेल्या बेटाभोवती प्रचंड जैवविविधता आढळली आहे.

रत्नागिरी समुद्र किनारी आहेत सॉफ्ट कोरल्स प्रवाळ प्रजाती
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; मदतीसाठी आलेल्यांनीच केला घात

अन्नजाळ्यांवर दूरगामी परिणाम

हवामानातील बदल, त्यामुळे होणारी समुद्राच्या पातळीतील वाढ, कमी होणारी ऑक्सिजनची पातळी, इतर रासायनिक प्रदूषण आणि सर्रासपणे होणारे ओव्हर फिशिंग यामुळे समुद्राची पृथ्वीवरील ‘बफर’ म्हणून भूमिका करण्याची क्षमता क्षीण करीत आहेत. समुद्राचे अ‍ॅसिडिफिकेशन, तापमान वाढ आणि डी ऑक्सिजनेशन यामुळे भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांवर परिणाम होऊन त्याची उत्पादकता आणि कार्यक्षमता घटेल. यात सातत्य राहिल्यास अन्नजाळ्यावर दूरगामी परिणाम होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com