आता प्रयोगशीलतेमधून आधुनिक शेतीला मिळणार प्रोत्साहन; चिपळुणात 18 गावांत मॉडेल व्हिलेज

18 villege model village in chiplun concept of development farming increased
18 villege model village in chiplun concept of development farming increased
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील १८ पंचायत समिती गणातील प्रत्येकी एका गावात मॉडेल व्हिलेजची संकल्पना राबविण्यात येणार आहे. पंचायत समिती आणि तालुका कृषी विभागाच्या विविध योजनांचा समन्वय साधून संबंधित गाव कृषीचे मॉडेल बनविण्याचे नियोजन आहे. आजूबाजूच्या पाच-सहा गावातील शेतकरी मॉडेल शेती पाहून, ते स्वतः तशी शेती करतील. प्रयोगशीलतेमधून आधुनिक शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी पंचायत समिती सदस्यांनीच पुढाकार घेतला आहे.

मॉडेल व्हिलेजसाठी पंचायत समिती सदस्यांनी दोन महिन्यांपूर्वीच्या मासिक सभेत चर्चा केली होती. मात्र, त्यास चालना मिळत नव्हती. अखेर काही दिवसांपूर्वीच याविषयीची बैठक पंचायत समितीच्या सभागृहात झाली. सभापती धनश्री शिंदे, उपसभापती पांडुरंग माळी, सर्व सदस्य, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पंचायत समिती व कृषीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मॉडेल व्हिलेज संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक पंचायत समिती गणात सरासरी पाच ते सात गावांचा समावेश आहे. संबंधित गणाचा सदस्य एक गाव निवडणार आहे.

निवड झालेल्या गावात पंचायत समिती तसेच तालुका कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, कृषी अधिकारी आधुनिक शेतीसाठी भर देणार आहे. त्या गावात प्रयोगशील शेती होण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. शिवाय रोजगार हमी योजनेतून कृषीची कामे करण्याचे नियोजन आहे. आंबा, काजू, मसाला पिके, विविध प्रकारचा भाजीपाला, फळबाग लागवड करण्यात येईल. शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याकरिता शेततळे, विहिरी आदींचाही समावेश केला जाणार  आहे. 

प्रत्येक गावासाठी एक अधिकारी

अनेक शेतकऱ्यांना कृषीच्या योजना माहित नसतात. एखाद्या गावात चांगली शेती झाली तर परिसरातील शेतकरी ही शेती पाहून त्याचे अनुकरण करतील. यातूनच व्यावसायिक शेतीला चालना मिळण्यास मदत होईल, असा सदस्यांना विश्‍वास आहे. त्याकरिता प्रत्येक गावांसाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जात आहे. या प्रकल्पाची प्राथमिक बैठक झाली.

"तालुक्‍यातील ओसाड जमिनी लागवडीखाली याव्यात. व्यावसायिक शेतीचे प्रमाण वाढावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. एका गावात मॉडेल शेती झाली तर परिसरातील शेतकरी त्याचे अनुकरण करतील. यासाठी १८ सदस्य आपल्या गणात हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत."

- धनश्री शिंदे, सभापती, चिपळूण पंचायत समिती

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com