कोकण : खेडच्या पोलिस निरीक्षक पत्की यांची रायगडला बदली

khed PI suvarna patki transfer raigad in ratnagiri
khed PI suvarna patki transfer raigad in ratnagiri
Updated on

खेड (रत्नागिरी) : खेड पोलिस स्थानकाची सूत्रे हाती घेतल्यापासून नेहमीच चर्चेत राहिलेल्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर आज रायगड येथे बदली केली. त्यांच्या विरोधात आमदार रामदास कदम यांनी विधान परिषदेत जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी केली होती. सदनात पत्कींवर गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी खेड येथील गोळीबार मैदानावर मनसेने आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक या क्रिकेट सामन्यांच्या बॅनरवर पत्की यांचा फोटो झळकला. तेव्हापासून यांच्या विरोधात वातावरण तापू लागले. आमदार कदम यांनी याबाबत सभागृहात छायाचित्रांकित पुरावे सादर करून 

खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की या शासकीय अधिकारी आहेत की कोणत्या पक्षाच्या पदाधिकारी, असा प्रश्न उपस्थित केला होता. म्हणून पत्की यांची जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार कदम यांनी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्की यांची तत्काळ जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आज ही बदली करण्यात आली.

पत्कींवर हे होते आक्षेप

  • कोरोना वाढत असताना क्रिकेट सामन्यांना परवानगी कशी दिली
  • ज्या मैदानात क्रिकेटचे सामने होते, त्या ठिकाणी हजारो प्रेक्षक होते
  • कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता, अंतर पाळले जात नव्हते
  • या गर्दीत पत्की प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या
  • मैदानावर हजारो लोक जमले कसे, गर्दीत तोंडाला मास्क नसताना पत्की यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com