'काँग्रेस संपलेली नाही अन् संपणारही नाही' Congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'काँग्रेस संपलेली नाही अन् संपणारही नाही'

२०२४ मध्ये किमान एक आमदार जिल्ह्यात निवडणून येईल, असे एकच लक्ष्य ठेवून सर्वांनी कामाला लागावे.

'काँग्रेस संपलेली नाही अन् संपणारही नाही'

ओरोस : काँग्रेस संपलेली नाही. संपणारही नाही. काँग्रेस पक्षाला पहिले प्राधान्य देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दोन किंवा तीन नंबरचे पद मिळते. पक्ष हा पायरी आहे. या पायरीचा पाया डळमळीत असल्यास पक्षाची इमारत उभी राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने जोमाने कामाला लागले पाहिजे. २०२४ मध्ये किमान एक आमदार जिल्ह्यात निवडणून येईल, असे एकच लक्ष्य ठेवून सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केले.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, पक्षात व्यक्ती म्हणून विचार न करता पक्ष म्हणून विचार करा. भविष्यात नगर परिषदा निवडणुका होऊ घातल्या आहेत. स्वबळावर किंवा आघाडी करून लढायच्या याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. पक्षातील कोणाचेही काम असेल तर कोल्हापूर किंवा मुबई येथील निवास्थानी या. तुमचे जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या सोबत अन्य मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये मी येईन. परंतु याची नोंद माझ्याजवळ असणार आहे. ज्याचे काम करणार त्याचे पक्षासाठी किती योगदान आहे, हे मी पाहणार. योगदान दिसले नाहीतर पुढचे काम उशिराने होणार, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले, मी दहा पावले तुमच्यासाठी चाललो तर तुम्ही पक्षासाठी १०० पावले चाला, असे आवाहन केले.

हेही वाचा: ठाकरे सरकारकडे घोटाळे करण्याच्या वेगवेगळ्या कला - सोमय्या

यावेळी सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, जिल्हा प्रभारी घोरपडे, विकास सावंत, साईनाथ चव्हाण, इरशाद शेख, नीता राणे, विद्याप्रसाद बांदेकर, अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, दादा परब यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बँकेत जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी हट्ट

जिल्हा बँक निवडणूक आघाडी करून लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक स्वतंत्रपणे काँग्रेस लढणार नाही. परंतु जागा वाटप करताना जास्तीत जास्त आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न संपर्कमंत्री म्हणून माझा असणार आहे. परंतु यासाठी उमेदवार निवडताना कोणाजवळ वोट बँक आहे, हा निकष लावला जाणार आहे. ज्याच्या जवळ वोटबँक व निवडून येण्याची क्षमता आहे. त्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यात काही नवीन चेहरेही दिले जातील. यावेळी मी नाही म्हणून आघाडीच्या उमेदवाराला मतदान नाही, असे करू नका असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

हेही वाचा: 'ग्रामविकास मंत्रालयाचे 1,500 कोटींचे टेंडर मुश्रीफांच्या घरातच'

loading image
go to top