नगराध्यक्ष बडतर्फ प्रकरणी 21 ला सुनावणी ; महाविकास आघाडीचे नगरसेवक परतले रिकाम्या हाती 

मुझफ्फर खान
Wednesday, 14 October 2020

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज त्यावर सुनावणी लावली होती.

चिपळूण - चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना बडतर्फ करण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्री यांनी यांनी पुढे ढकळली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा हिरमोड झाला. जिल्हाधिकार्‍यांनी 
पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीचे नगरसेवक नाराज होऊन परतले. 

नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी आतापर्यंत केलेल्या कामांपैकी 19 कामांवर आक्षेप घेत त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीकरून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज त्यावर सुनावणी लावली होती. जिल्हाधिकारी आज निर्णय देतील. या अपेक्षेने महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक आणि मार्गदर्शक जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते.
 

जिल्हाधिकारी यांनी आज निर्णय दिल्यानंतर चिपळूणात धमाका करू आणि  भर पावसात फटाके फोडू अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर फिरत होते. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेवक आशिष खातू, नूपूर बाचीम, परिमल भोसले, रसिका देवळेकर यांच्यासह प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते उपस्थित होते. पुकारणी झाल्यानंतर महाविकास आघाडीचे 18 नगरसेवक आणि नगराध्यक्षा खेराडे जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेले.

हे पण वाचाकोकणवासीयांनो सावधान; विजांचे तांडव सुरू आहे

 जिल्हाधिकारी यांनी सर्वांची हजेरी घेवून 21 ऑक्टोबर पुढील तारिख दिली. महाविकास आघाडीकडून आजच निकाल द्या अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे धमाका करण्याच्या तयारीने गेलेले महाविकास आघाडीचे नगरसेवक आणि पदाधिकारी रिकाम्या हाती माघारी परतले.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21st hearing in the case of mayor Bad side case