esakal | संगमेश्वर तालुक्यात पोलिस पाटील यांची 23 पदे रिक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

23 Police Patil Post Vacant In Sangmeshwar Taluka

गावचा वनपोलिस पाटील हा महसूल व गृह यांच्यामधील महत्त्वाचा दुवा. गावाची इत्यंभूत माहिती पोलिस पाटील याच्याकडे असते. त्याच्या मदतीने पोलिस अथवा तलाठी यांना गावात प्रभावीपणे काम करता येते; मात्र हीच पोलिस पाटील पदे रिक्त असतील तर सर्वांना काम करणे कठीण जाते, हा अनुभव सध्या संगमेश्‍वर तालुक्‍यात आहे.

संगमेश्वर तालुक्यात पोलिस पाटील यांची 23 पदे रिक्त 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आरवली ( रत्नागिरी) - संगमेश्वर तालुक्‍यात 69 पोलिस पाटील पदांपैकी 23 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदाचे काम उर्वरित पोलिस पाटलांना करावे लागते. त्यामुळे त्यांची दमछाक होत आहे. ही पदे तातडीने भरावेत, अशी मागणी होत आहे. 

गावचा वनपोलिस पाटील हा महसूल व गृह यांच्यामधील महत्त्वाचा दुवा. गावाची इत्यंभूत माहिती पोलिस पाटील याच्याकडे असते. त्याच्या मदतीने पोलिस अथवा तलाठी यांना गावात प्रभावीपणे काम करता येते; मात्र हीच पोलिस पाटील पदे रिक्त असतील तर सर्वांना काम करणे कठीण जाते, हा अनुभव सध्या संगमेश्‍वर तालुक्‍यात आहे. गावात शांतता व सुव्यवस्था राखणे व त्याची माहिती कळविणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागितलेली माहिती पुरविणे, दंडाधिकारी व पोलिस, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे, सार्वजनिक शांततेस ज्या गोष्टींमुळे धोका होईल, अशा गोष्टींची माहिती गुप्तपणे पोलिस, अधिकाऱ्यास देणे अशी अनेक कामे करावी लागतात. गावात वरिष्ठ अधिकारी आला तर त्याची ऊठबस करावी लागते. तो अधिकारी जोपर्यंत गावाबाहेर जात नाही तोपर्यंत पोलिस पाटलाला त्या अधिकाऱ्याबरोबर थांबावे लागते.

या सर्व कामापोटी पोलिस पाटलांना मासिक सहा हजार रुपये मानधनात काम करावे लागत आहे. ते सुद्धा वेळेवर मिळत नाही. प्रामाणिकपणे काम करूनही काहीवेळा वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. काम करताना काहीवेळा समाजाचा रोष ओढवून घ्यावा लागतो. याचा विचार करून पोलिस पाटील मानधनात वाढ करावी व रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. 

पोलिस पाटलांना सदैव सतर्क राहावे लागते. त्याला अर्थार्जनासाठी दुसरे काम करता येत नाही. सध्याचे मानधन अपुरे आहे. अतिरिक्त कार्यभारासाठी प्रोत्साहनपर भत्ता मिळावा. 
- रवींद्र महाडिक, अध्यक्ष, 
संगमेश्वर तालुका पोलिस पाटील संघटना. 
 

loading image