esakal | रत्नागिरीकरांना दिलासा; 24 तासांत 392 रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीकरांना दिलासा; 24 तासांत 392 रुग्ण

रत्नागिरीकरांना दिलासा; 24 तासांत 392 रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सलग आठ दिवस पाचशेच्या सरासरीने प्रतिदिन बाधित रुग्ण सापडत असतानाच सोमवारी (26) रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला. मागील चोविस तासात 1 हजार 466 चाचण्यांमध्ये 392 बाधित रुग्ण आढळले. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 1 हजार 195 आरटीपीसीआर चाचणीत 254 बाधित तर 271 ऍण्टीजेन चाचणीत 138 बाधित रुग्ण सापडले आहेत. एकूण चाचण्यांपैकी 1 हजार 74 जणांचे अहवाल अबाधित आले आहेत. आतापर्यंत आरटीपीसीआरपेक्षा ऍण्टीजेनमधील बाधितांचा आकडा अधिक होता. ऍण्टीजेनची विश्‍वासार्हता कमी असल्याने गोंधळ उडत होता.

गेल्या आठ दिवसांतील आकडेवारी पाहता, सातत्याने चारशेपेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांमध्ये भितीचे वातावरण होते. सोमवारी सायंकाळच्या अहवालात ऍण्टीजेनच्या चाचण्या कमी झाल्या आहेत. त्यात पन्नास टक्‍के बाधित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 19 हजार 616 झाली आहे. मागील चोविस तासातील रुग्णांमध्ये सर्वाधिक महिला रुग्णालय 48, संगमेश्‍वर रुग्णालय 14, उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात 24, सावर्डेत 13, दाभाळ केंद्रात 28, रुग्ण आहेत. तसेच ऍण्टीजेनमध्ये शिर्केतील केंद्रावर 59, कामथेत 20, चिपळूण आरोग्य केंद्रात 12, बीएमएच खासगी रुग्णालयात 14 जणं आहेत.

loading image