गणेशोत्सवसाठी कोकण रेल्वेच्या जादा चोविस गाड्यांचे 'असे' आहे वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

सावंतवाडी ते वेलांकणी विशेष गाडी
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई सीएसटीएम, एलटीटी, पनवेल, तसेच पुणे, अहमदाबाद येथून जादा गाड्या धावणार आहेत. यंदा सावंतवाडी ते वेलांकणी ही विशेष गाडी २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत सोडण्यात येणार आहे.

कणकवली - गणेशोत्सवाला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या गणेशभक्तांसाठी कोकण रेल्व यंदा सज्ज झाली असून या मार्गावर गणेशोत्सव काळात २४ जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा मुंबई सेंट्रल, बांद्रा आणि अहमदाबाद या पश्‍चिम रेल्वेच्या जादा गाड्या धावणार असून याही गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 

मुंबई सीएसटीएम येथून ०१००१ ही गाडी  २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत दर मंगळवारी व शनिवारी तर परतीसाठी त्याच दिवशी सावंतवाडी येथून सुटणार आहे. तसेच मुंबई सीएसटीएम येथून ०१००७ ही गाडी २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत रात्री १२.२० वा. सुटून परतीसाठी सावंतवाडी येथून ०१००८ ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३ वा. निघणार आहे.

पनवेल ते थिवीम ०१०१३ ही गाडी २४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी रात्री ९ वाजता सुटणार आहे. परतीसाठी ०१०१४ ही गाडी रविवारी दुसऱ्या दिवशी थिवीम येथून सकाळी ११.३० वा. सुटणार आहे. मुंबई सीएसटीएम ते रत्नागिरी ही गाडी २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत धावेल. पनवेल ते सावंतवाडी ०१०३५ गाडी २९ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत पनवेल येथून सकाळी ७.५० वा. सुटणार असून सावंतवाडी येथून ०१०३६ ही गाडी त्याच दिवशी रात्री ११ वा. सुटणार आहे.

एलटीटी- झाराप ०१०३९ ही गाडी २ ते १६ सप्टेंबर या कालावधीत दर सोमवारी १.१० वा. सुटणार आहे. परतीसाठी त्याच दिवशी झाराप येथून दुपारी ३.३० वा. सुटणार आहे. झाराप ते पनवेल ०१०४२ ही गाडी २३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी सकाळी ११.१० सुटणार असून परतीसाठी ०१०४३ पनवेल येथून त्याच दिवशी रात्री ११.४५ वा. सुटेल. सावंतवाडी पनवेल ०१०४४ ही गाडी २४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत दर शनिवारी सकाळी १० वा. सुटणार आहे. पनवेल- सावंतवाडी ०१०४७ ही गाडी १ सप्टेंबरला पनवेल येथून रात्री ८ वा. सुटेल. परतीसाठी २ सप्टेंबरला सावंतवाडी येथून सकाळी ६ वा. सुटेल. 

एलटीटी ते पेडणे ०१०६९ ही गाडी ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत दर शुक्रवारी एलटीटी येथून रात्री १.२० वा. सुटेल, परतासाठी त्याच दिवशी पेडणे येथून ०१०७० ही गाडी दुपारी १ वा. सुटेल. सावंतवाडी -एलटीटी ही ०११८२ विषेशगाडी ११ व १८ सप्टेंबरला सावंतवाडी येथून सकाळी १० वा. सुटेल. पुणे ते रत्नागिरी ०१४३१ ही गाडी २९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी ६.४५ वा. सुटून परतीसाठी ०१४३२ ही गाडी शुक्रवारी सकाळी ८ वाजता रत्नागिरी येथून सुटेल. पनवेल सावंत ०१४३३ ही गाडी ३१ ऑगस्टला सायंकाळी ७.४० सुटून परतीसाठी १ सप्टेंबरला सावंतवाडी येथून सायंकाळी ६ वाजता सुटेल. 

मुंबई सेंट्रल ते मेंगलोर ०९००१ ही गाड्या २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरला सुटणार आहे. मुंबई सेंट्रल ते थिवीम ही गाडी २९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत दर गुरूवार व सोमवारी सुटेल. बडोदा जंक्‍शन ते सावंतवाडी ही गाडी १ व ८ सप्टेंबरला सुरटणार  आहे. अहमदाबाद सावंतवाडी ही गाडी २८ ऑगस्ट व १० सप्टेंबरला सुटणार आहे. मेंगलोर ते बांद्रा आणि ०९०१० ही गाडी परत ४ आणि ११ सप्टेंबरला सुटणार आहे. 

सावंतवाडी ते वेलांकणी विशेष गाडी
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई सीएसटीएम, एलटीटी, पनवेल, तसेच पुणे, अहमदाबाद येथून जादा गाड्या धावणार आहेत. यंदा सावंतवाडी ते वेलांकणी ही विशेष गाडी २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत सोडण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 trains for Ganesh Festival on Konkan Railway Route