Sheel Dam : रत्नागिरीला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात फक्त 25 टक्केच पाणी; पानवल धरणही गळतीमुळे बंद!

रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे तीन जलस्रोत आहेत. शीळ, पानवल धरण (Panvel Dam) आणि नाचणे येथील तलावामधून पाणीपुरवठा केला जातो.
Sheel Dam Ratnagiri
Sheel Dam Ratnagiriesakal
Summary

यंदा एलनिनोमुळे परतीचा पाऊसच झाला नाही. हा पाऊस झाला तर शीळ धरण २० ते २५ दिवस भरून वाहते. त्यामुळे तेवढे दिवस पुढे उन्हाळ्यात शहराला चांगला पाणीपुरवठा होतो.

रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये (Sheel Dam Ratnagiri) आता अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा उपयुक्त पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरेल, असा दावा पालिका प्रशासनाने (Ratnagiri Municipality) केला आहे. पाणीटंचाई आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कधीही दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या दृष्टीने पालिकेचे नियोजन सुरू आहे.

रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे तीन जलस्रोत आहेत. शीळ, पानवल धरण (Panvel Dam) आणि नाचणे येथील तलावामधून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी पानवल धरणाला गळती असल्याने ते बंद ठेवले आहे, तर नाचणेतील तलाव आटल्यामुळे एका शीळ धरणावर शहराची भिस्त आहे. गेल्या वर्षी या महिन्यात शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरू होता. एप्रिल महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता.

Sheel Dam Ratnagiri
छत्रपती शिवराय अन् 'विक्रमादित्य'वरील बोधचिन्ह..; अखंड लाकडात दोन बाय तीन फूट आकाराची साकारली कलाकृती

यंदा एलनिनोमुळे परतीचा पाऊसच झाला नाही. हा पाऊस झाला तर शीळ धरण २० ते २५ दिवस भरून वाहते. त्यामुळे तेवढे दिवस पुढे उन्हाळ्यात शहराला चांगला पाणीपुरवठा होतो. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.७७६ दशलक्ष घनमीटर आहे; परंतु या वेळी पाऊस कमी झाल्याने फेब्रुवारीपासूनच धरणातील साठा मर्यादित झाला. सध्या या धरणामध्ये ०.८१९ दशलक्ष घनमीटर एवढा साठा आहे. धरणात २५ टक्केच पाणी आहे. हे पाणी १५ जूनपर्यंत पुरेल, अशी अपेक्षा आहे.

Sheel Dam Ratnagiri
Kolhapur Lok Sabha : वाढला मतदानाचा टक्का, कोणाला बसणार धक्का; 'या' मतदारसंघातील मतदान ठरणार निर्णायक

टंचाईचे संकट गडद

शहरात साडेअकरा हजार नळधारक असून, त्यांना दिवसाला २० एमएलडी पाणीपुरवठा करावा लागतो. धरणात आता २५ टक्केच साठा शिल्लक आहे. सध्या जैसे थे परिस्थिती असली तरी १५ जूनपर्यंत पाणी पुरावे यासाठी कधीही दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com