esakal | रेंज नाही, इंटरनेट नाही, अभ्यास कसा करु ? अडीच हजार विद्यार्थ्यांना पडलाय हा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

2500 students faced problem of online education in ratnagiri rajapur due to range and network problem

राजापूर तालुक्‍यातील अडीच हजार विद्यार्थी ॲन्ड्रॉईड मोबाईलविना

रेंज नाही, इंटरनेट नाही, अभ्यास कसा करु ? अडीच हजार विद्यार्थ्यांना पडलाय हा प्रश्न

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. मोबाईल रेंजसह इंटरनेट सेवेअभावी २१ व्या शतकातील डिजिटल युगामध्ये अनेक गावांमधील विद्यार्थ्यांचा ॲन्ड्रॉईड मोबाईल आणि टीव्ही उपलब्ध असतानाही ऑनलाइन शिक्षणप्रणालीचा खेळखंडोबा झाला आहे.

हेही वाचा - कामाबद्दल शाबासकी तर नाहीच मात्र पत्रे आली 

ऑनलाइन शिक्षणप्रणालीत विद्यार्थ्यांना मोबाईल ॲप वा टीव्हीच्या माध्यमातून शिकविले जाते. याचा फायदा तालुक्‍यातील काही गावांसह शाळांमधील विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामध्ये मोबाईलद्वारे २ हजार १७१ तर टीव्ही सुविधेच्या माध्यमातून ५ हजार ८७३ असे मिळून आठ हजारांहून अधिक विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. कधी मोबाईल रेंज नाही, तर कधी इंटरनेट नाही, तर कधी टीव्ही सुविधा नाही, अशा कारणांमुळे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

२१व्या शतकातील डिजिटल युगामध्ये अनेक गावांना मोबाईल नेटवर्कची अद्यापही प्रतीक्षा आहे. काही गावांमध्ये मोबाईल टॉवर उभे आहेत. मात्र, ते कार्यान्वित नाहीत. काही गावांमध्ये महिनोन्‌महिने मोबाईल रेंज वा इंटरनेट सुविधा गायब असते. काही गावांमध्ये रेंज तुटकतुटक आहे. इंटरनेट कमालीची स्लो. त्यातून, या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे.  

हेही वाचा -  विकेल ते पिकेल साठी झाली कोकणातील या पाच जिल्ह्यांची निवड​

 

आश्‍वासनापलीकडे काहीही नाही 

काही भागांमध्ये मोबाईल टॉवर वर्षानुवर्षे उभे आहेत. मात्र, ते कार्यान्वित नाहीत. मोबाईल रेंज वा इंटरनेट सुविधा गायब झालेली आहे. याबाबत संबंधित गावांमधील लोकांनी मोबाईल कंपन्या वा बीएसएनएलकडे अनेकवेळा तक्रारीही केल्या. मात्र,आश्‍वासनापलीकडे त्यांना काहीही मिळालेले नाही. लोकांच्या या गैरसोयींकडे लोकप्रतिनिधी ढुंकूनही पाहताना दिसत नाहीत.  

संपादन - स्नेहल कदम 

loading image