esakal | कामाबद्दल शाबासकी तर नाहीच मात्र पत्रे आली
sakal

बोलून बातमी शोधा

Dapoli Land Records Department employees surveyed for six ekar in heavy rain but no officer no recognising in ratnagiri

त्यासाठी १४ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहावे, असे पत्र आपल्याला प्राप्त झाले आहे.

कामाबद्दल शाबासकी तर नाहीच मात्र पत्रे आली

sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ (रत्नागिरी) : वादळवारा, पावसाची तसेच जागेत वाढलेल्या झाडा-झुडपांची, वाढलेल्या गवताची तमा न बाळगता दापोली तालुक्‍यातील गिम्हवणे येथील सहा एकर जागेची मोजणी दापोली भूमी अभिलेख विभागाच्या एका बहाद्दर कर्मचाऱ्याने तुफानी पावसात केली; मात्र या कामाबद्दल शाबासकी देण्याऐवजी ही मोजणी कशी केली? याबाबत आपले म्हणणे सादर करा, असे पत्र त्यांच्या वरिष्ठांनी दिले आहे.

हेही वाच - विकेल ते पिकेल साठी झाली कोकणातील या पाच जिल्ह्यांची निवड

गिम्हवणेतील एका जागेची तातडीची मोजणी १७ भूकरमापक एस. जी. सावनगिरे यांनी पूर्ण केल्याचा अहवाल त्यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, दापोली यांना सादर केला. १७ जुलैला तालुक्‍यात सरासरी ५४ मि.मी. पाऊस कोसळला. सावनगिरे यांनी मोजणी केलेल्या जागेत प्रवेश करण्यासाठी एक पऱ्हा पार करावा लागतो. पऱ्ह्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तो पार करून मोजणी करावयाच्या जागेत प्रवेश करणे जवळ जवळ अशक्‍य आहे. याबाबत लगतच्या जागेचे मालक अजित कोळेकर यांचे म्हणणे बोलके आहे. 

दापोली भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक एखाद्या जागेत झुडपे वाढलेली असतील, गवत वाढलेले असेल तर ती जागा साफ केल्याशिवाय मोजणी करत नाहीत, असा अनुभव आहे. सावनगिरे यांनी सेवेतील अनुभव व कौशल्य पणाला लावून या जागेची मोजणी पूर्ण केल्याने त्यांच्या सेवेचा उचित गौरव करण्यात यावा तसेच इतर कर्मचाऱ्यांना मोजणी करता येत नाही, अशा जागांची मोजणी करण्याचे कामही सावनगिरे यांच्याकडे सुपूर्द करावे, अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री, राज्याचे जमाबंदी आयुक्‍त यांच्याकडे करणार असल्याची माहिती कोळेकर यांनी ‘सकाळ’ला दिली. 

हेही वाच - बनावट ग्राहक बनून या दुर्मिळ प्राण्याची तस्करी रोखली  

स्थळ पाहणीची विनंती करणार

सावनगिरे यांनी १७ जुलैला केलेल्या मोजणीसंदर्भात आपल्याला शंका असून आपण उपअधीक्षक भूमी अभिलेख, दापोली यांच्याकडे लेखी तक्रार केली. या कार्यालयाकडून मी केलेल्या तक्रारीची चौकशी होणार आहे. त्यासाठी १४ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहावे, असे पत्र आपल्याला प्राप्त झाले आहे. मोजणी केलेल्या जागेची उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी पाहणी करावी, अशी मागणी करणार आहेत.

दृष्टिक्षेपात

- त्या दिवशी पडला 
- ५४ मि.मी. पाऊस
- मोजणीसंदर्भात 
- शंका उपस्थित
- जमाबंदी आयुक्‍तांकडे लक्ष वेधणार

संपादन - स्नेहल कदम 

loading image