रत्नागिरी : विहीर साफ करण्यासाठी उतरलेले तिघे गुदमरले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 June 2019

विहिरीत पडलेल्याना बाहेर काढण्यासाठी अडथळे येत आहेत. विजय श्रीपाद सागवेकर (४४, रा. निवसर, सोनारवाडी), नंदकुमार सीताराम सागवेकर (४२, सोनारवाडी), अनिल गोविंद सागवेकर (२७, रा. बाबर, खोचाडेवाडी) अशी मृत झालेल्या तिघांची नवे आहेत. विहिरीत गॅस तयार झाल्यामुळे आणि ऑक्सिजनची कमी असल्यामुळे हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

रत्नागिरी - निवसर (ता. लांजा) येथे विहिर उपसा करण्यासाठी खाली उतरलेले तीघे गुदमारल्याची घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. विहिरीत उतरणे धोका असल्यामुळे त्या तिघांना अद्यापही बहर काढण्यात आलेले नाही. त्याचा मृत्यू झाला असावा अस अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

विहिरीत पडलेल्याना बाहेर काढण्यासाठी अडथळे येत आहेत. विजय श्रीपाद सागवेकर (४४, रा. निवसर, सोनारवाडी), नंदकुमार सीताराम सागवेकर (४२, सोनारवाडी), अनिल गोविंद सागवेकर (२७, रा. बाबर, खोचाडेवाडी) अशी मृत झालेल्या तिघांची नवे आहेत. विहिरीत गॅस तयार झाल्यामुळे आणि ऑक्सिजनची कमी असल्यामुळे हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

पोलिसांनी फिनोलेक्स कंपनीच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले होते रात्री उशिरा फिनोलेक्स कंपनीचे पथक येथे दाखल झाले होते. न्यू सर सोनारवाडी येथील विजय  सागवेकर हे आपल्या घराशेजारी असलेली विहीर उपसण्यासाठी दुपारी विहिरीत उतरले होते. परंतु बराच वेळ झाल्यानंतरही ही ते विहिरीतून बाहेर न आल्याने त्यांच्यासमवेत असलेले दोन सहकारी नंदकुमार सिताराम सागवेकर, अनिल गोविंद सागवेकर हे दोघे विहिरीत उतरले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तिघेही विहिरीबाहेर न आल्याने ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. विहिरीत वाकुन पाहिल्यानंतर तिघेही ही बेशुद्ध पडलेल्या स्थितीत दिसले. या घटनेची माहिती पोलीस पाटील दत्ताराम मिस्त्री यांनी पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम सिंह पाटील, पोलीस कर्मचारी चेतन उतेकर, सुरेश शिरगावकर यांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली. त्यावेळी विहिरीत तिघेही होते. तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अन्य ग्रामस्थांना खाली उतरणे धोकादायक असल्याने श्री. ढेरे यांनी फिनोलेक्स कंपनी च्या अग्निशामक दलाला पाचारण केले होते. रात्री उशिरा फिनोलेक्सच्या  पथकातील जवान  प्रयत्न करीत होते. अंधार असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.

मृत झालेले तिघेही एकाच वाडीतील असल्याने निवसर सोनार वाडीवर शोककळा पसरले आहे. विहिरीत उतरलेल्या तिघांचा मृत्यू नेमका कोणत्या काराणातून झाला आहे. हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 people due to suffocation while cleaning the well