
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. तीन वर्षांमध्ये पालिका सुमारे ३३ कोटींच्या आर्थिक बोजाखाली दबली आहे. यामध्ये विविध योजना आणि विकासकामांच्या १० टक्के रकमेसह पालिकेच्या विविध विभागांच्या कामाच्या देयकांचा समावेश आहे. याचा शहरातील भविष्यातील विकासकामांवर मोठा परिणाम होणार आहे. पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.