वाशिष्ठीच्या संपूर्ण खोऱ्यामध्ये अर्जुनाची बहुसंख्येने झाडे असलेली ही कोकणातील एकमेव देवराई होती. ती सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची होती.
चिपळूण : सती (ता. चिपळूण) पुलाजवळ असलेल्या सैय्यद सैफुल्ला बाबा दर्गाच्या (Syed Saifullah Baba Dargah) परिसरातील साडेतीनशे वर्षांपूर्वीची देवराई तोडण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील दर्गा परिसरात असलेली एकमेव देवराई नष्ट झाली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.