Cyclone Tauktae : रत्नागिरीतील 365 जणांना सुरक्षित स्थळी हलवले

Cyclone Tauktae : रत्नागिरीतील 365 जणांना सुरक्षित स्थळी हलवले
Updated on
Summary

वादळामुळे त्यावरील खलाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठिकाण हलविण्याचे आवाहन केले आहे.

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तिव्रता वाढली असून रत्नागिरीत (Ratnagiri) हलक्या वार्‍यासह पाऊसही पडू लागला आहेत. वादळापूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. राजापूर तालुक्यातील आंबोळगडसह 652 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले (652 people evacuated) आहे. प्रशासन सज्ज झाले असून किनारी भागांवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात आले आहे. (652 people evacuated from ratnagiri as cyclone intensifies)

Cyclone Tauktae : रत्नागिरीतील 365 जणांना सुरक्षित स्थळी हलवले
'तौक्ते'चा अर्थ काय? कुठून आलं नाव? जाणून घ्या सर्वकाही

तौक्ते चक्रीवादळ दुपारी राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथून जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार आहे. राजापूरात सकाळपासून वार्‍याचा वेग वाढला असून पाऊसही पडत आहे. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली आहेत. ती बाजूला करण्याचे काम सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यात पहाटेपासून हलके वारे वाहण्यास सुरवात झाली. अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. या वार्‍यामुळे मोठे नुकसान झालेले नाही. समुद्र किनार्‍यांवर लाटांची गाज ऐकायला मिळत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड, गणेशगुळेसह परिसरातील 85 कच्च्या घरातील 652 नागरिकांचे आजूबाजूच्या घरात स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरीतील सर्वात मोठ्या मिरकरवाडा बंदरामध्ये शेकडो नौका उभ्या करुन ठेवण्यात आल्या आहेत. वादळामुळे त्यावरील खलाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठिकाण हलविण्याचे आवाहन केले आहे.

Cyclone Tauktae : रत्नागिरीतील 365 जणांना सुरक्षित स्थळी हलवले
सावधान! चार दिवसात कोकण किनारपट्टीवर ‘तोक्ते’ चक्रीवादळ धडकणार

तहसिलदार शशिकांत जाधव, सहायक मत्स्य आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आज सकाळी मच्छीमारांशी संवाद साधला. अनेक मच्छीमारांनी खलांशांना आपापल्या गोडावूनमध्ये जागा उपलब्ध करुन दिली आहे. सुमारे दीड हजाराहून अधिक खलाशी आहेत. राजापूरच्या सीमावर्ती भागात वादळाची आले असून तालुक्यात सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वादळी वारा व पाऊस सुरू झाला आहे. आंबोळगड येथील 68 कुटुंबातील 254 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मुसाकाझी येथील दोन कुटुंबातील लोकांचे स्थलांतर केले. आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

Cyclone Tauktae : रत्नागिरीतील 365 जणांना सुरक्षित स्थळी हलवले
निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरून पुढे सरकले, पण धोका कायम; वाचा जिल्ह्यात कोठे काय घडले?

राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून, झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. नाटे आणि परिसरात वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. जैतापुरात वार्‍यामुळे घरांची किरकोळ पडझड झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या 24 तासात 124 मिमी पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 39 मिमी पाऊस पडला. संगमेश्वरात 22 मिमी, दापोली आणि गुहागरात प्रत्येकी 12 मिमी, लांजा आणि राजापूरला प्रत्येकी 13 मिमी पाऊस पडला. (652 people evacuated from ratnagiri as cyclone intensifies)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com