सावधान! चार दिवसात कोकण किनारपट्टीवर ‘तोक्ते’ चक्रीवादळ धडकणार

सावधान! चार दिवसात कोकण किनारपट्टीवर ‘तोक्ते’ चक्रीवादळ धडकणार

रत्नागिरी : पुढील चार दिवसात कोकण (Kokan) किनारपट्टीवर ‘तोक्ते’ चक्रीवादळ (Tokte Hurricane)धडकणार असून या कालावधीत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून समुद्रकिनार्‍यापासून पाच किलोमीटरपर्यंत राहणार्‍या गावांना संभाव्य चक्रीवादळाचा इशारा दवंडी द्वारे द्या असे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा (Collector Laxmi Narayan Mishra) यांनी दिले.

Cyclone Tokte Konkan coast in four days kokan update marathi news

समुद्रात मासेमारी गेलेल्या नौकांनाही तटरक्षक दलाद्वारे सुचना दिल्या जात असून अनेक मच्छीमार माघारी परतू लागले आहेत.जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार आणि पोलीस यंत्रणेची बैठक दूर दृश्य प्रणालीद्वारे गुरुवारी (ता. 13) बैठक झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, आपत्ती व्यवस्थापन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते. अरबी समुद्रात लक्षद्विपजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘तोक्ते’ नाव दिले आहे. त्याच्या प्रवासात केरळ, तामिळनाडूसह कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर वारे वाहणार आहेत.

मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. वादळाची नेमकी दिशा कशी राहील हे अद्याप अनिश्‍चित आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणानी सज्ज रहावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व मच्छीमारांना त्वरित बंदरात आणण्याचे काम तटरक्षक दल, कस्टम्स आणि पोलीस दलाकडे सोपवण्यात आले आहे. तटरक्षक दलाकडून समुद्रात जाऊन सुचना देण्यास सुरवात झाली आहे.

चक्रीवादळाची तीव्रता कमी असली तरी येणार्‍या काळात त्याचे रूपांतर कसे होईल याबाबत निश्‍चित सांगणे अवघड आहे. त्यामुळे पूर्वतयारी करून कमीत कमी नुकसान होईल यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची आवश्यकता असल्याचे मिश्रा यांनी प्रशासनाला सुचित केले आहे. हे चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात 15 ते 16 या दोन तारखे दरम्यान पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून गावोगावी धान्यपुरवठा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. इतर अत्यावश्यक सुविधांमध्ये औषधे, दवाखान्यातील दाखल रुग्णांची सुरक्षितता, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तत्परता दाखवावी अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार या कालावधीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची जवळील समुद्रकिनार्‍यावर जमिनीवर पोहोचेल असा अंदाज आहे. निसर्ग चक्रीवादळात प्रशासनाने शिकस्त करुन जीवीतहानी टाळण्यात यश मिळवले होते.

Cyclone Tokte Konkan coast in four days kokan update marathi news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com