पाळंदे समुद्रकिनाऱ्याजवळ आढळला 37 फूटाचा मृत व्हेल मासा

चंद्रशेखर जोशी
Monday, 28 September 2020

दापोली तालुक्यातील डॉल्फिन पहाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनाऱ्याजवळील पाण्यात काल सायंकाळी मृत व्हेल मासा वहात आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी किनाऱ्यावरच खड्डा खणून त्याचे दफन केले आहे. 

याबाबत माहिती देताना पाळंदे येथील अभी भोंगले म्हणाले, की काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक मोठा मासा समुद्रकिनारी पाण्यात वाहत आलेला आढळला. याबाबत माहिती दापोली येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर वन विभागाचे कर्मचारी पाळंदे किनाऱ्यावर जेसीबी घेऊन आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हेल जातीचा मासा असून त्याची लांबी 37 फूट आहे.

हेही वाचा - गणपती मंदिर बंदच, आता उंदीरही झाला बंदिस्त 

हा व्हेल मासा कमी पाण्यात असल्याने तो सडला आहे. त्याचा घेर घेण्याचे काम सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने हा मासा पाण्यातून काढून समुद्रकिनारी खड्डा खणून तो दफन करण्यात येणार आहे. दापोली तालुक्यातील डॉल्फिन पहाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. पर्यटकांना बोटीतुन नेऊन हे डॉल्फिन दर्शन घडविले जाते. यामुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

समुद्रात उडी घेणारे डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. यापूर्वी या किनाऱ्यावर मृत डॉल्फिन अनेक वेळा वहात आले आहे. वनविभागाचे महेश पाटील, सुरेखा जगदाळे, सुरज जगताप , पाळंदे गावातील प्रीतम व सुरेश तवसाळकर, मंगेश पडावे, अभय नरवणकर, अनिल आरेकर, संकेत तवसाळकर, अनिकेत बोरकर हे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली.

हेही वाचा -  पर्यटन वाढीसाठी मांडवीत क्रुझ टर्मिनल, बिच शॅक्स 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 37 feet dead whale fish found in ratnagiri dabhol sea area forest department pull out