दुचाकी खरेदीच्या जाहिरातीतून या युवकाला ३९ हजार ७०० रुपयाला बसला गंडा....

39 700 by forgetting the advertisement for the purchase of a two-wheeler
39 700 by forgetting the advertisement for the purchase of a two-wheeler
Updated on

पावस (रत्नागिरी)  : तालुक्‍यातील नाखरे-रामेश्वरवाडी येथील तरुणाची दुचाकी खरेदीच्या जाहिरातीला भुलून ३९ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलिस ठाणे येथे मुंबईतील एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


मुंबईतील आरोपी राजकुमार कैलास शेट यांनी दुचाकी विक्रीची जाहिरात दिली होती. ही जाहिरात सौरभ विश्‍वनाथ गुरव (रा. रामेश्‍वरवाडी, नाखरे) पाहिली. त्यानंतर सौरभने २ जुलैला राजकुमार शेठ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून दुचाकी २३ हजाराला खरेदी करण्याचे मान्य केले. त्यानंतर गुरव यांच्या व्हॉट्‌स ॲपवर दुचाकीचा फोटो, आरसी बुक, आधार कार्ड, ओळखपत्र अशा कागदपत्रांचे फोटो पाठवले.

त्यानंतर राजकुराम शेट याने गुरव याच्या मोबाईलवर अकाऊंट नंबर आयएफसी कोड पाठवला आणि फोन करून दुचाकीचे पैसे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे गुरव यांनी २५ जुलैला गुगल अकाऊंटवरून सहा हजार तीनशे रुपये व २६ जुलैला गुरव याच्या सांगण्यावरून त्यांच्या बहिणीचे पती सुदीप सुनील पाटील (रा. जुवेवाडी, पावस) यांचे गुगल अकाऊंटवरून ३३ हजार ४०० रुपये राजकुमार शेट याला पाठवले. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com