सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या चार पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

अमित गवळे  
गुरुवार, 28 जून 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील  राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार पदाधिकाऱ्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ग. रा. म्हात्रे, पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघ अध्यक्षा गीता पालरेचा, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे आणि पाली शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर यांनी आपले राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेस नेते वसंत ओसवाल यांच्याकडे दिले आहेत. या राजीनाम्यामागे काही दिवसांपूर्वी पक्षाला रामराम करून गेलेले पाली उपशहर प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी पुन्हा पक्षात घेणार असल्याचे मुख्य कारण आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी कौटुंबिक, व्यावसायिक व वैयक्तिक कारणे दिली आहेत. मात्र अजूनही त्यांचे राजीनामे स्विकारले गेले नाहीत.       

या बाबत पार्श्वभूमी अशी की, अनुपम कुलकर्णी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराजी दाखवत 23 मे रोजी आपल्या उप शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर त्यांनी अनुपम दादा मित्र मंडळ ही संघटना सुरू केली. मात्र येत्या रविवारी (ता.1) पालीत अनिकेत तटकरे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचवेळी आमदार सुनील तटकरे व मुख्य पदाधिकाऱ्यांची बेठक सुद्धा आहे. या सत्कार कार्यक्रमात अनुपम कुलकर्णी व त्यांचे शेकडो कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार होते. त्या वेळी कुलकर्णी यांना पाली शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार होती. अशी समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. नेमके हेच कारण या चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे आहे असे सर्व स्तरातून बोलले जात आहे. 

आमचे राजीनामे स्वीकारले नाहीत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी मी राजीनामा द्यायचे ठरवले होते. आमच्या राजीनाम्याचे अनुपम कुलकर्णी हे कारण निश्चित नाही. आम्हाला कोणाचाही आकस नाही. प्रत्येकाने कुठे थांबायचे ते ठरविले पाहिजे.
- गीता पालरेचा, अध्यक्षा, पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस

त्यांनी राजीनामा देण्याचे महिनाभर आधीच ठरले होते. राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ व बड्या नेत्यांमुळे आता 1 तारखेच्या कार्यक्रमात मी व माझे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार नाही आहोत. फक्त आमच्या मित्रमंडळ संघटनेचे उदघाटन करू.
- अनुपम कुलकर्णी, माजी उपशहर प्रमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पाली

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 officials of ncp resigns in sudhagad pali