४१ लाखांची दारू जप्त; सिंधुदुर्गात राज्य उत्पादन शुल्काची कारवाई

इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई
41 lakh liquor seized State excise action Banda kokan update
41 lakh liquor seized State excise action Banda kokan updatesakal

बांदा : राज्य उत्पादन शुल्काच्या इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल ४१ लाख ४० हजारच्या दारूसह नऊ लाख ५० हजारांचा ट्रक असा मिळून एकूण ५० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल (ता. ३) रात्री उशिरा करण्यात आली. मात्र, अंधाराच्या फायदा घेऊन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे गाडीत मिळालेल्या कागदपत्रांनुसार वाहन मालक दशरथ मीणा (रा. मध्य प्रदेश) याच्यासह अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई इन्सुली तपासणी नाका तसेच राज्य उत्पादन शुल्क पथकाने केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की गोव्यातून बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इन्सुली तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क व इन्सुली तपासणी नाका पथकातर्फे गोव्याहून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती. या वेळी बांद्याकडून येणारा ट्रक (MP १३ GA ७९३८) तपासणीकरिता थांबविण्यात आला. वाहनाची तपासणी केली असता त्यात तब्बल ४१ लाख ४० हजारांच्या दारूसह नऊ लाख ५० हजारांचा ट्रक असा मिळून एकूण ५० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात १८० मिलीलिटर मापाच्या एकूण २७ हजार ६०० सीलबंद काचेच्या बाटल्या (एकूण ५५२ बॉक्स) आढळल्या.

रात्रीची वेळ असल्याने अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक पसार झाला. गाडीत मिळालेल्या कागदपत्रानुसार वाहनमालक व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्गचे अधीक्षक डॉ. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आर. ए. इंगळे, संजय मोहिते, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, कुडाळ निरीक्षक अमित पाडळकर, कोल्हापूर जिल्हा पथकातील दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी, ए. बी. पाटील, एस. बी. यादव आदींनी केली. या प्रकरणी श्री. मोहिते पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com