जिल्ह्यातील ४९ धरणांत ४३.६७ टक्के पाणीसाठा
१३ (टूडे ३ साठी, मेन)
- rat२२p१४.jpg-
२४M८५१२७
कोंड्ये येथील धरण
जिल्ह्यातील धरणांत ४३.६७ टक्के साठा
पाणी पातळीत कमालीची घट ; आठवडाभरातील वळवाच्या पावसावर मदार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्यामुळे पाण्याची टंचाई गेल्या वर्षीपेक्षा अधिक त्रासदायक झाली आहे. जिल्ह्यातील तीन मध्यम आणि ४६ लघू अशा एकूण ४९ धरणांमध्ये सध्या २१६.६३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात ४३.६७ टक्के साठा आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात ०.७२८ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी वळवाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत थोडासा दिलासा मिळेल अशी आशा आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस, कमालीची वाढलेली उष्णता यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी जिल्ह्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. खेड तालुक्यातील नातूवाडी, संगमेश्वर तालुक्यातील गडनदी आणि राजापूर तालुक्यातील अर्जुना या तीन मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण १८२.६९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. शुक्रवारपर्यंत या पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा ५ टक्क्यांनी घट झाली आहे. या तीनही मध्यम धरणांमध्ये मिळून एकूण ११७.९५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६४.५६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १०८.७१६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४७.१५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. जिल्ह्यातील ४६ लघू प्रकल्पांमध्ये घट झाली आहे. या सर्व धरणांमधील एकूण २३०.५५८ दशलक्ष घनमीटरपैकी आता केवळ १०० दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ४७.१५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना करता यंदा ४६ लघू प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठ्यात सुमारे चार टक्के घट झाली आहे.
दरम्यान, रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची संचय पातळी १२.३०० दशलक्ष घनमीटर इतकी असून संचय पातळी ३.३४० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यापैकी सध्याची पाणीपातळी १११ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा ०.७२८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. म्हणजेच या धरणात २१.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
--------
चौकट
मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)
* नातूवाडी : ५१.८१ (६०.१५ टक्के)
* गडनदी : ८.३९ (३०.८१ टक्के)
* अर्जुना : ५७.१४ (७९.५८ टक्के)
* एकूण : ११७.९५ (६४.५६ टक्के)
* गतवर्षीपेक्षा घट : पाच टक्के
* एकुण ४६ लघू प्रकल्प : १००.६८८ (४३.६७ टक्के)
* गतवर्षीपेक्षा घट : चार टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.