"नीतेश राणे यांना विषमता बाळगूनच कामकाज करायची सवय असेल तर त्यांना मंत्रिपदावरून दूर करण्याचा अधिकार त्यांना शपथ देणाऱ्या राज्यपालांना आहे."
रत्नागिरी : मंत्रिपदाच्या शपथेचे उल्लंघन करणाऱ्या नीतेश राणे यांना राज्यपालांनी मंत्रिपदावरून दूर करावे, नीतेश राणे (Nitesh Rane) यांची आमदारकी रद्द करावी, अशा प्रकारची मागणी अर्जाद्वारे प्रथमच राज्यपालांकडे करण्यात आली आहे. ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राज्यपालांकडे हा अर्जात केला आहे.
त्यात नमूद केले आहे, की १३ फेब्रुवारी २०२५ ला ओरोस येथे भाजपच्या कार्यकर्ता शिबिरात बोलताना जे भाजपचे (BJP) सदस्य आहेत त्यांनाच निधी, विकासनिधी मिळेल इतरांना काहीही मिळणार नाही, असे जाहीर वक्तव्य मंत्री राणे यांनी केले होते.