esakal | माड्याचीवाडीत 52 कुटुंबीयांचा अधिपती, गावडे घराण्याचा वारसा
sakal

बोलून बातमी शोधा

52 Families Ganesh In Madyachiwadi Inheritance Of Gawde Family

गेल्या काही वर्षापासून प्रत्येक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे हे आपल्याला सऱ्हास दिसून येते. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती अजूनही चिरकाल टिकून आहे.

माड्याचीवाडीत 52 कुटुंबीयांचा अधिपती, गावडे घराण्याचा वारसा

sakal_logo
By
अजय सावंत

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - एकत्र कुटुंब पद्धती आज लोप पावत चालली असताना तालुक्‍यातील माड्याचीवाडी येथील गावडे घराण्याने गेली पाच पिढ्यांचा वारसा जोपासताना त्यांच्या 52 कुटुंबीयांचा अधिपती हे निश्‍चितच एकत्र कुटुंबाचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. पाच दिवसांचा त्यांचा गणपती असतो. ववसा कार्यक्रम हे सुद्धा या घराण्याचे वैशिष्ट्ये आहे. यावर्षी मात्र कोरोना नियमांच्या अधीन राहून दरवर्षी तीनशे ते साडेतीनशे माणसाऐवजी फक्त 25 ते 30 माणसे याठिकाणी आहेत. कोरोनामुळे एकही चाकरमानी आला नाही या घराण्याने पाच दिवसांचा नियोजनबद्ध उपक्रम हाती घेतला आहे. 

गेल्या काही वर्षापासून प्रत्येक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे हे आपल्याला सऱ्हास दिसून येते. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती अजूनही चिरकाल टिकून आहे. असेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास कुडाळ तालुक्‍यातील माडयाचीवाडी येथील गावडे घराण्याचे. गेली पाच पिढ्या असणाऱ्या या गावडे घराण्यांमध्ये 52 कुटुंबियांचा हा गणपती असतो.

गणपतीच्या दिवशी या देवघरांमध्ये सुमारे तीनशे ते चारशे माणसे या गणेशोत्सव कालावधीत एकत्र आल्याचे दिसून येतात. ही सर्व 52 कुटुंबे नेरूर वाघचौडी येथे वास्तव्य करतात. गणेशोत्सव कालावधीत ते माड्याचीवाडी येथे आपल्या मूळ देवघरच्या ठिकाणी जिथे श्री गणेशाचे पूजन होते त्याठिकाणी येतात. या घराण्यात शाम गावडे यांचा परिवार असतो. माड्याचीवाडी ग्रामपंचायतनजीक हे घराणे आहे.

पाच दिवस मनोभावे सेवाअर्चा केली जाते. विशेष म्हणजे या गणपतीच्या पाचही दिवस स्थानिक भजनांना याठिकाणी प्राधान्य देण्यात येते. स्थानिक भजने मोठ्या प्रमाणात याठिकाणी पाचही दिवस होत असतात. आताची गावडे घराण्याची ही पाचवी पिढी असून या घराण्याचा गणपती गेली तीन पिढ्या नेरूर वाघोसेवाडी येथील मधुकर सडवेलकर या घराण्याकडे आहे. 

दरवर्षी गणेशाची एकच मूर्ती असते गेल्या पाच पिढ्यामध्ये गणेश मूर्ती आजतागायत बदललेली नाही. सुख दुःखाचे कार्य घडले तरी गणपती हा पाच दिवसाचाच असतो. 

सद्यस्थितीत गेले सहा महिने कोरोनाचे संकट असल्याने शासन नियमांच्या अधीन राहून या घराण्याने नियोजन केले आहे. याबाबत पिंट्या गावडे म्हणाले, ""दरवर्षी तीनशे ते साडेतीनशे माणसे या ठिकाणी पाच दिवस असतात. यामध्ये चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यावेळी मात्र एकही चाकरमानी आला नाही. फक्त 25 ती 30 माणसे गर्दी न करता हा कार्यक्रम करत आहेत. सर्व चाकरमान्यांनी आपआपल्या ठिकाणी थांबून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून श्रींचे दर्शन घेतले. भजनाचे प्रमाण यावेळी फारच कमी आहे. सर्व नियमांच्या अधीन राहून केले जात आहे. पाचव्या दिवशी महाप्रसादाला रांगा लागून गर्दी होऊ नये म्हणून दुपारपासून रात्रीपर्यंत प्रसाद असणार आहे.'' 

यंदा असा होणार ववसा कार्यक्रम 
पाचव्या दिवशी 52 कुटुंबातील सुमारे दीडशे महिला ववसा घेऊन या गणपतीच्या ठिकाणी येतात. सायंकाळी पाचपर्यंत हा कार्यक्रम चालतो; मात्र यंदा ववसा कार्यक्रम कोरोना नियमांच्या अधीन राहून केला जाणार आहे. सर्व सासू आपल्या सुनेचा ववसा घेणार आहेत. गर्दी नको म्हणून ही उपाययोजना केली आहे, अशी माहिती पिंट्या गावडे यांनी दिली. 
 

 
 

loading image
go to top