Kokan Rain Update - रत्नागिरीत सरासरी 54.44 मिमी पावसाची नोंद

सकाळी रत्नागिरीत पावसाने विश्रांती घेतली परंतु दुपारी पुन्हा संततधार सुरु झाली
Kokan Rain Update - रत्नागिरीत सरासरी 54.44 मिमी पावसाची नोंद

र(त्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र (ratnagiri district) पावसाने हजेरी लावली असून रत्नागिरी (heavy rain) तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. रविवारी सकाळी रत्नागिरीत पावसाने विश्रांती घेतली. पण दुपारी पुन्हा संततधार सुरु झाली. जिल्ह्यात 24 तासात सरासरी 54. 44 (avarage rain 54.44 mm) मिमी तर एकूण 490 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 45.30 मिमी, दापोली 16.40 मिमी, खेड 59.40, गुहागर 52.30 मिमी, चिपळूण 32.30 मिमी, संगमेश्वर 57.10 मिमी, रत्नागिरी 104.60 मिमी, राजापूर 61.00 मिमी, लांजा 61.60 मिमी.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 13 जुनला सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे (natural disaster) झालेल्या नुकसानीची माहिती अशी, मंडणगड तालुक्यात दोणारी-वडवली रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद होता. सदर ठिकाणी सा. बां. विभागाने दरड हटवून रस्ता सुरळीत केला आहे. दापोली तालुक्यात (dapoli) मौजे दापोली येथे मिलींद तुकाराम खोपटकर यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे घराचे नुकसान झाले. तसेच मौजे दाभोळ येथे विजय बोरघरे यांच्या घराचा बांध ढासळल्याने शेजारील रामचंद्र बोरघरे यांच्या घराचेही नुकसान झाले. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

Kokan Rain Update - रत्नागिरीत सरासरी 54.44 मिमी पावसाची नोंद
आम्हीच तुमची वाट पाहतोय; संभाजीराजेंचे नक्षलवाद्यांना पत्र

चिपळूण तालुक्यात (chiplun) माउकी येथे संतोष घाणेकर यांच्या घरावर वीज पडून घराचे अंशत: नुकसान झाले. मौजे नांदिवसे-राधागनर येथे विनायक शिंदे यांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने तो जळून खाक झाला. राजापूर तालुक्यात मौजे दोनिवडे येथे बाळू भागाजी पवार यांच्या घराचे पावसामुळे 1 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे चुनाकोळवण येथे लक्ष्मण तानाजी मटकर यांच्या पडवीचे पाऊसामुळे अंशत: 45 हजार रुपयांचे नुकसान झाले. मात्र पावसामुळे झालेल्या या नुकसानीत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com