रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सहा नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सहा नवे रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बाधितांचे प्रमाणही कमी झाले आहे. आज झालेल्या १ हजार १२२ कोरोना चाचण्यांमध्ये सहा बाधित रुग्ण सापडले असून आठजण कोरोनामुक्त झाले आहेत. चिपळूण तालुक्यात अॅन्टिजेन चाचणीमध्ये पाच तर रत्नागिरी आरटीपीसीआरमध्ये एका रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ८ लाख २१ हजार २२२ रुग्णांचे निगेटिव्ह स्वॅब आले आहेत तर ७६ हजार ४७९ रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी (ता. १५) मिळालेल्या माहितीवरून, दिवसभरात झालेल्या आरटीपीसीआरची व अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये सहा रुग्ण बाधित सापडले आहे. तर गृहविलगीकरणात ३० रुग्ण तर संस्थात्मक विलगीकरणात २० रुग्ण आहेत. टेस्टमधून दिवसभरात बाधित सापडलेल्यांमध्ये मंडणगड-०, दापेाली ०, खेड ०, गुहागर ०, चिपळूण ५, संगमेश्‍वर ०, रत्नागिरी १, लांजा ०, राजापूर ० आदींचा समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचा टक्का ९६.७९ आहे. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत २ हजार ४८३ जणांची मृत्यूची नोंद झाली आहे. आज मृत्यूची नोंद नाही. मृत्यूदर ३.१४ टक्के आहे. सध्या जिल्ह्यात उपचाराखालील बाधितांची संख्या ५० आहे.

कोरोनाची स्थिती :

गृहविलगीकरणात रुग्ण : ३०

संस्थात्मक विलगीकरण : २०

उपचाराखालील बाधित : ५०

loading image
go to top