यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. कुसबे पोखरण गावातील ठाकरे शिवसैनिकही भाजपवासी झाले. देवगड जामसंडे नगरपंचायतमधील ठाकरे शिवसेनेचे गटनेते बुवा तारी, नगरसेवक संतोष तारी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
ओरोस : भाजप पक्षाने (BJP) आज ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला. ओरोस येथे आयोजित कुडाळ तालुका भाजप मेळाव्यात कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे सर्व नगरसेवक, काँग्रेसच्या (Congress) दोन्ही नगरसेविका यांच्यासह ‘महाविकास’च्या ६०० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.