रत्नागिरी : सलग जोडून आलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांची (Tourist) पावले आपसुकच कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे वळली आहेत. त्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे किनारी शनिवारपासूनच गर्दी होती. गणपती मंदिर (Ganesha Temple) प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांत साधारण ६५ हजार भाविकांनी दर्शन घेतले. सर्वाधिक गर्दी रविवारी (ता. १३) होती.