esakal | वैभववाडी शहरात अवघ्या एका तासात झाला ६८ मि.मी पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

वैभववाडी शहरात अवघ्या एका तासात झाला ६८ मि.मी पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : शहर परिसरात काल ता.३ दुपारी ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाची नोंद तब्बल ६८ मि.मी झाली आहे.विजांच्या कडकडाटासह तासभर झालेल्या या पावसाने दाणादाण उडाली होती.शहरातील अनेक दुकानांच्या पायरीपर्यत पाणी साचले होते तर संपुर्ण रस्त्यांना नाल्यांचे रूप प्राप्त झाले होते.

तालुक्याच्या काही भागात काल ता.३ दुपारी एक वाजल्यापासुन विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरूवात झाली.याचवेळी वैभववाडी शहर परिसरात देखील जोरदार पावसाला सुरूवात झाली.न थांबता शहरात तासभर पाऊस झाला.ढगफुटीसदृश्य या पावसाने दाणादाण उडाली.रस्त्यावरील वाहतुक पुर्णपणे थांबली गेली. शहरातील बहुतांशी भाग उताराचा असुनही रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र होते.रस्त्याना नाल्याचे रूप प्राप्त झाले होते.तासभर झालेल्या पावसाने शहरातील जनजीवन ठप्प झाले होते. काही दुकानांच्या पायरीपर्यत पाणी साचले होते.शहरात सर्वत्र जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान ढगफुटीसदृश्य झालेल्या या पावसाची नोंद नेमकी किती झाली याची उत्सुकता होती.दुपारी एक ते दोन या काळात पाऊस झाला.त्यानंतर आज पहाटेपर्यत फारसा पाऊस झालेला नाही.दरम्यान काल तासभर झालेल्या पावसाची नोंद ६८ मि.मी इतकी झाली आहे.तासाभरात झालेला हा शहरातील उचांकी पाऊस आहे.वैभववाडी वगळता कुडाळ तालुक्यात ३८ मि.मी पावसाची नोंद झाली.उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये पावसाची नोंद 0 आहे.

loading image
go to top