रत्नागिरीत 7 जणांना कोरोनाची लागण..संख्या गेली 113 वर...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जिल्ह्यात आणखी 7 जणांना कोरोनाची बाधा.. रुग्णसंख्या 113 वर

रत्नागिरी : जिल्ह्यात आणखी सात कोरोनाची बाधित रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात नऊ अहवाल आले यातील तब्बल सात अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत.  पॉसिटीव्ह रुग्ण मुंबईतुन दाखल झाले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रुग्णाची संख्या 113 झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. मोठया संख्येने चाकरमानी कोकणात दखल होत आहे. या चाकरमान्याना होम क्वारंटाईन केले जात आहे. लक्षणे असलेल्या चाकरमान्याचा नमुना तपासनीसाठी पाठवला जात आहे. मागील काही दिवसात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून बाधित रुग्ण हे मुंबईकर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा- राणे म्हणतात सिंधुदुर्गात होतो कोरोना रिपोर्टमध्ये चमत्कार .....कसा तो वाचा.

गेल्या  चोवीस तासात नऊ अहवाल प्राप्त झाले. यातील सात अहवाल कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वरवली धुपेवाडी, कोरेगाव बेलवाडी, दहिवली धामनदेवी, चिपळूण, दहिवली, होडबे दापोली आणि दहिवली येथील हे सात रुग्ण आहेत. जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या आता 113 वर पोचली आहे.        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 more corona patients in ratnagiri