रत्नागिरीतील 7 पोलिस हवालदार झाले पीएसआय

शेळके
Wednesday, 21 October 2020

प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली

रत्नागिरी : राज्यातील 1 हजार 61 पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश गृहविभागाने जारी केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सात पोलिस हवालदारांचा समावेश आहे. ते आता पीएसआय (पोलिस उप निरीक्षक) म्हणून सेवा बजावणार आहेत.

प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरला राज्यातील 1 हजार 61 पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती दिल्याची यादी जाहीर केली. गृहविभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील पोलिसांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सर्व 1061 हवालदार लवकरच पीएसआय’च्या वर्दीत दिसणार आहेत.

हेही वाचा- कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन महिला जखमी -

जिल्ह्यातील  7  पोलिस हवालदारांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये उदय लक्ष्मण धुमास्कर,  कोकण परिक्षेत्र (ठाणे ग्रामीण वगळून ), प्रकाश बाळकृष्ण बाईंग शहाजी भिमराव पवार, अनिल पांडुरंग चांदणे, प्रकाश पांडुरंग जाधव (कोकण परिक्षेत्र ), आनंद शंकर पवार कोकण परिक्षेत्र (ठाणे ग्रामीण वगळून ), विनायक काशिनाथ नरवणे यांची बदली रत्नागिरी तून अमरावती विभागात झाली आहे. विनायक नरवणे हे (एटीएसला) कर्तव्याला होते.

गृहमंत्र्यांकडून शुभेच्छा

राज्यातील 1061 पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या पोलिस उप निरीक्षकांनी अधिक जोमाने कार्य करा. तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांना ट्विट करून दिले.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 police constable become PSI in ratnagiri